जत | पुन्हा फुटके रस्ते,सुसाट वाहतूक जिवघेणी ठरतेयं |

0
5

जत,प्रतिनिधी : अंरुद व फुटके रस्ते, बेदरकार वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यावरून चालने मुश्कील बनले आहे. अक्षरश: जीव मुठीत धरून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. घरातून बाहेर पडलेली व्यक्‍ती धडधाकटपणे परतेल की नाही याची शाश्‍वती देता येत नसल्याचे वास्तव आहे. अल्पवयीन मुले वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून बेदरकारपणे वाहने चालवत आहेत. त्यात पुन्हा दारूसह विविध प्रकारची व्यसने करून वाहन चालविणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे अपघात ही गोष्ट नित्याचीच बनली आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत असून अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व येत आहे. यावर उपाययोजना म्हणून बेदरकार वाहन चालकांवर कारवाईशिवाय पर्याय नाही. ती कधी होणार? असा सवाल नागरिकांतून व्यक्‍त होत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने नव्याने झालेल्या दर्जाहीन रस्त्याचे बारा वाजविले आहे.त्यामुळे खड्डे नाहीत असे रस्तेच उरले नाहीत.खड्डे चुकवितानाचे अपघात नित्याचे झाले आहेत.शहरात गेल्या काही  महिन्यांपासून बेदरकार वाहन चालकांमुळे झालेल्या अपघातात तब्बल पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात यांचा काय दोष? या अपघांना कारणीभूत ठरलेले अद्याप बिनधास्त फिरत आहेत. अशा  बेदरकार वाहन चालकांवर कारवाई होणार की नाही? असा सवाल सर्वसामान्यांतून व्यक्‍त होत आहे. 

हुल्लडबाजांवर कारवाई होत नसल्याचे चित्र…

वाहतूक पोलिसांकडून बहुतांशीवेळा सर्वसामान्यांवरच कारवाई होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो. बेदरकारपणे वाहन चालविणारे, नियम धाब्यावर बसविणारे हुल्लडबाज तरुण वाहतूक पोलिसांसमोरून बिनधास्त जात असल्याचे वास्तव आहे. 

अशा हुल्लडबाजांच्या वाहनांना नंबरप्लेट नसल्याने त्यांच्यावर कारवाईही होत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे अशा हुल्लडबाजांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दारू पिऊन, गुटखा-मावा खाऊन एका दुचाकीवर तिघे-तिघे बसून आरडा-ओरड करत जाणारे तरुण प्रत्येक रस्त्याला दिसतात. शाळा-महाविद्यालयांच्या समोर तर वाहतुकीचा मार्ग अडवून अशा हुल्लडबाजांची टोळकी थांबलेली असतात. मनाला येईल तशी वळणे घेत, पाहिजे त्या स्पीडने, चुकीच्या दिशेने वाहन चालविणार्‍या या हुल्लडबाजांमुळे सर्वसामान्यांचे वाहन चालविणे सोडाच रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here