नाटक ” अलबत्या गलबत्या -” धूम धमाल मनोरंजन “

0
20


बालनाट्याचा उपयोग हा व्यक्तिगत विकासासाठी चांगला होतोसभाधीटपणा याच बरोबर आपल्यामधील कलागुणांना मिळणारा वाव आणि संधी हि बालनाट्यातून मिळतेमुलांना उत्साहऊर्जा आणि आनंद सुद्धा मिळतो तो वेगळाच असतोसर्वसाधारणपणे ७० च्या दशकात बालनाटके भरात होतीत्यावेळी रत्नाकर मतकरीसुधा करमरकरसुलभा देशपांडे यांनी लहान मुलांच्यासाठी विशेष परिश्रम घेऊन बालनाट्याची निर्मिती केली होतीत्यावेळी बालरंगभूमी बहरलेली होती तेंव्हा पासून अनेक कलाकार रंगभूमीवर आलेमुलांना नाटकाची आवड निर्माण होऊ लागलीव्यक्तिगत विकासासाठी नाटकाचा उपयोग होऊ लागलाबालनाट्यातून करमणूकप्रबोधन दोन्ही मुलांना देण्यासाठी मदत होत होतीबालकांच्या बरोबर त्यांचे पालकशिक्षकसर्वजण नाटके पाहत असल्याने त्यांच्यामध्ये प्रेमजिव्हाळाकरमणूकप्रबोधन असे सारे सहजपणे होत होतेमुलांच्या विकासासाठी पालक त्यात रस घेऊ लागले होतेमुंबईपुणे इत्यादी ठिकाणी बालरंगभूमीची वाटचाल होत असतानाच त्यातून अनेक कलाकार रंगभूमीला मिळाले.

” अलबत्या गलबत्या ” हे सत्तरच्या दशकात गाजलेलं बालनाटयत्यावेळी चेटकिणीची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली होतीआज तेच नाटक अद्वैत थिएटर तर्फे निर्माते राहुल भंडारे यांनी रंगभूमीवर आणले असून झी मराठी ने हे नाटक सादर केलं आहेलेखन रत्नाकर मतकरी आणि दिगदर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे.

बालनाट्य म्हंटल कि राजाप्रधानसेनापतीराजकन्याज्योतिषीउंदीरमांजरबोकेकुत्राहि मंडळी असली कि मुलांना गंमत वाटतेअलबत्या गलबत्या मध्ये आहे एक राजातो आहे चक्रम आणि विचित्रपणे वागणारात्याचे प्रधान आणि सेनापती हे सुद्धा तसेच चक्रमपणा करण्यात हुशारराजाला एक सुंदर राजकन्या असून तिचे लग्न करायचे असे ठरते आणि ज्योतिषाला बोलावले जाते तो सांगतो कि राजकन्येचा विवाह एका सर्वसामान्य अश्या अलबत्या गलबत्या बरोबर होईलराजाला धडकी भरतेतो राजकन्येला नजरकैदेमध्ये ठेवतो.

अलबत्या गलबत्या ह्या सर्वसामान्य शिपायाची गाठ जंगलात चेटकिणीशी पडतेतिला एका गुहेतून एक जादूची आगपेटी हवी असतेअलबत्या तेथे जातोहिरेमाणकेसोनेनाणे आणि आगपेटी आणतोपण दुष्ट चेटकिणीचे कपटकारस्थान त्याच्या लक्षांत येतेत्याला राजकन्या भेटते आणि पुढे काय ??? —- ते सारे बालनाट्यात पाहायला मजा येईल.

आजच्या काळाबरोबर जाईलआजच्या मुलांना आपलीशी वाटेल अशी हि कथा सादर केली आहेअनेक बदल त्यात आहेतआधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग पुरेपूर करून घेतला आहेबालनाट्य सादर करताना मुलांच्या भावविश्वाचात्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून रंजकता आणि अद्भुतपणा सारे काही उत्तम सादर केलं आहेहे नाटक मुलांना खिळवून ठेवतेनाटकातील पात्र योजना योग्य अशीच आहेअलबत्या च्या भूमिकेत सनीभूषण मुणगेकर हा धमाल करतोत्याला साथ देणारे उंदीरबोकोबाभाटीबाईकुत्राराजाप्रधानसेनापती हे सारे सागर सातपुतेदिलीप कराडकुणाल धुमाळबाळकृष्ण वानखेडेसंदीप रेडकरसायली बांदकरह्या कलाकारांची साथ छान लाभली आहेराजकन्या श्रद्धा हांडेज्योतिषी दीपक कदम यांनी मजा आणली पण सर्वात मजा आणि धमाल आणली ती चेटकिणीच्या भूमिकेतील वैभव मांगले यांनी, ” कित्ती ग बाई मी हुश्शार ” हे पालुपद धमाल उडवतेवैभव मांगले नी हि भूमिका अप्रतिमपणे त्यातील सर्व बारकावे दाखवत सादर केली आहेचेटकिणीची रंगभूषा वेशभूषा उलेश खंदारेमहेश शेरला यांची आहेमयुरेश माडगावकर यांचे संगीत सुरवातीपासूनच बालप्रेक्षकांचा ताबा मिळवतेसंदेश बेंद्रे यांचे नेपथ्य डोळ्यात भरतेआणि शीतल तळपदे यांची प्रकाश योजना डोळे दिपवते,

अलबत्या सनीभूषण मुणगेकर आणि चेटकीण वैभव मांगले हे धमाल करतातदोघे लक्षांत राहतातझी मराठी ने सादर केलेलं आणि अद्वैत थिएटर चे निर्माते राहुल भंडारे यांनी सादर केलेलं एक उत्तम रंगतदार बालनाटय धमाल उडवतेनाटक एक नंबरी सादरीकरण शंभर नंबरी असे आहे.

दीनानाथ घारपुरे मनोरंजन प्रतिनिधी ९९३०११२९९७


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here