संख,वार्ताहर: सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व अन्य मागण्यासाठी मराठा समाजाच्या ‘महाराष्ट्र बंदला संखमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले.अप्पर तहसिल कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला.अंदोलनात संखसह माडग्याळ, दरिबडची, ज्याल्याळ,को.बोबलाद,गिरगाव,व्
छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस डॉ.भाऊसाहेब पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अंदोलनास सुरूवात करण्यात आली.तेथून अप्पर तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला.
सुजाता कुंडले,मयुरी जाधव,अरूणा गायकवाड,शिवतेज जाधव,विनोद माने,सरदार पाटील,प्रणाली पाटील,नाना शिंदे, कृष्णदेव गायकवाड, यांनी आरक्षण व सध्य स्थिती यावर भुमिका मांडली.कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या,मेगाभर्ती मराठा आरक्षण पुर्तता झाल्यावर करावी,सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे,मुलींना शिक्षणामध्ये 50 टक्के सवलत द्यावी
मराठा समाजाच्या उन्नती साठी आरक्षण आनिवार्य आहे. शासनाच्या वेळकाडू धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला.त्वरीत आरक्षण द्यावे अशा मागणी निवेदन देण्यात आले. सिताराम गायकवाड यांनी प्रस्तावित केले.
तहसीलदार नागेश गायकवाड यांना जेष्ठ नेते डॉ.भाऊसाहेब पवार व युवतींनी निवेदन अंदोलनाला लोणारी समाज संघटना,मुस्लिम अल्पसंख्याक कॉ.पक्ष,नागपंथी डवरी समाज,शेतकरी संघटना,लिंगायत समाज,धनगर समाज संघटनेनी पाठिबां दिला.डॉ.संभाजी जाधव,नामदेव जाधव,के.बी.नलवडे,विठ्ठल निकम,डॉ.प्रकाश सांवत,तुकाराम सांवत,सौ.साधना सांवत,भारत सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. जेष्ठ नेते डॉ.भाऊसाहेब पवार यांनी अंदोलकांची जेवन न नाष्ठाची सोय केली होती.
संख येथे मराठा आरक्षण मागणीचे निवेदन तहसीलदार नागेश गायकवाड यांना देताना आंदोलक






