जत | विजापूर-गुहागर मार्गावर चक्काजाम,जतेत शांततेत कडकडीत पुर्ण दिवस बंद |

0
6

जत,प्रतिनिधी : मराठा क्रांती ठोक मोर्चा जतच्या वतीने आज सकाळी येथील सकल मराठा समाजाचे वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एक आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले.गुरुवारी सकाळी येथील विजापूर -गुहागर राज्य मार्गावरील महाराणा प्रताप चौकात मराठा समाज बांधवांचे वतीने ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर जत शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत पदयात्रा काढण्यात आली. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान शहरातील रिक्षा चालक संघटनांनी, खासगी वडाप वाहतूक  संघटनांनी, एस. टी.कामगार व व्यापारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार विलासराव जगताप म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. तसेच इतर समाजाला ही अारक्षण मिळावे. यासाठी सरकारने सकल मराठा समाजाच्या भावनांचा विचार करावा. सरकारने मागासवर्गीय आयोगाला अहवाल तयार करण्यासाठी जो कालावधी दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन जास्तच उग्रस्वरूप धारण करीत आहे.त्यामुळे सरकारने मागासवर्ग आयोगाला अहवाल देण्यासाठी कालमर्यादा घालावी.व मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून या समजाला लवकरात लवकर अरक्षण द्यावे.मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनात माझा सहभाग असणार आहे. मागासवर्गीय आयोगाने चालढकल न करता लवकरात लवकर अहवाल सादर करावा.यासाठी मी व माझे सहकारी आमदार यांनी मुख्यमंत्र्याशी सविस्तर चर्चा केली आहे. त्यामुळे आपणाला अारक्षण मिळेलच असे आ. जगताप शेवटी म्हणाले. यावेळी डाॅ.महेश भोसले, मराठा सेवा संघाचे सुधीर चव्हाण, वैभव सुर्यवंशी, यांनी मार्गदर्शन केले. प्रणाली पाटील वाळेखिंडी, व स्नेहल लावंड या युवतीनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी जुनोनी,कवठेमहांकाळ व रामपूर येथील ढोलकी सम्राट धनाजी केंगारसह संदिप मोहीते.यांनी भारूडातून समाज प्रबोधन केले.या आंदोलनात पं .स .सदस्य सुनील पवार,अॅड. प्रभाकर जाधव, जि.प.सदस्य विक्रमसिंह सावंत. एन.डी.शिंदे करिअर अकॅडमीचे पांडुरंग सावंत, नगरसेवक उमेश सावंत,विजय ताड,प्रकाश माने,नाना शिंदे, उत्तम चव्हाण, संग्राम पवार, सुहास चव्हाण,अमर जाधव, आदेश जाधव,अनिल शिंदे, बाळासाहेब जाधव, अमोल चव्हाण, सुभाष शिंदे, प्रमोद सावंत, डाॅ. रविंद्र आरळी, डाॅ. मनोहर मोदी, श्रीकृष्ण पाटील, गणेश सावंत, अनिल शिंदे, मोहन माने-पाटील, अरूण शिंदे, राजेंद्र शिंदे, आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा बंद कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला.

जत शहरातील विजापूर-गुहागर मार्गावर चक्काजाम अंदोलन करण्यात आले.त्यावेळी आ.विलासराव जगताप यांनी मार्गदर्शन केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here