
जत : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज राज्यात पुकारलेल्या बंदला जतच्या विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.तालुक्यातील जत,डफळापूर, शेगाव,माडग्याळ, उमदी,संख आदी गावात सकाळपासूनच बंदचे वातावरण तयार झाले आहे. नागरिकांनी स्वेच्छेनेच आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. शाळा महाविद्यालयांना संस्थाचालकांनी सुरक्षिततेची बाब लक्षात घेत, सुटी दिली आहे.जत शहरात आंदोलकांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. भगवे फेटे घातलेले शेकडो आंदोलक महाराणा प्रताप चौकात जमले होते.तेथे एक कार्यक्रम घेण्यात आला. मराठा आरक्षण स्थिती, अंदोलनाची भुमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
विजापूर-गुहागर, जत-सांगली,जत-चडचडण, जत-सांगोला या मार्गावर सकाळी सात वाजल्यापासूनच आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले.तालुक्यातील जवळपास सर्वच गावात सकाळपासूनच कडकडीत बंद पाळला जात आहे.
जत आगाराची बससेवा पूर्णपणे बंद आहे.जतसह प्रमुख गावातील बाजारपेठांमध्येही सकाळपासून शुकशुकाट होता.



