जत,प्रतिनिधी : शासन आदेशावरून जत तालुक्यातील प्रत्येक गावात दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या.जत येथील तलाठी भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रांताधिकारी तुषार ठोंबरे,तहसिलदार अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत दक्षता समित्या जबाबदारी,व कार्य यांची माहिती देण्यात आल्या.
जत तालुक्यातील वाढत्या वाळू,मुरूम,दगड चोरीच्या पाश्वभूमीवर शासनाने गावपातळीवर दक्षता समित्या स्थापन करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीत संरपच अध्यक्ष असणार आहेत.तर तलाठी सचिव राहणार आहेत.ग्रामसेवक,पोलिस पाटील, कोतवाल समितीचे सदस्य असतील.
जत तालुक्यातील अनेक नदी,ओढे व तलावातून बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे.त्यांना रोकण्यासाठी महसूल प्रशासनाची यंत्रणा कमी पडत होती.त्यामुळे वाळू उपसा सुरू आहे. निर्सगांची हानी व हरित लवादाच्या नियमानुसार दुष्काळी तालुक्यातील वाळू उपसा बंदी आहे.त्याचे काटेखोर पालन करण्यासाठी जत महसूल सरसावला आहे.त्या पाश्वभूमीवर गावातच वाळू तस्करी रोकता यावी यासाठी दक्षता समित्या स्थापन्यात आल्या आहेत. त्यांनी वाळू तस्करी होत असल्यास अटकाव करून संबधित यंत्रणेला माहिती द्यावी अशी जबाबदारी त्यांना निश्चित केली आहे. त्यातूनही वाळू तस्करी कायम राहिल्यास त्या दक्षता समितीला जबाबदारी धरून कारवाई करण्यात येणार आहे. तालुक्यातील जवळपास सर्व गावात या समित्या स्थापन्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात वाळू तस्करीला अटकाव होईल असे चित्र सध्यातरी आहे.
जत तालुक्यातील गावातील दक्षता समितींना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार अभिजित पाटील, नागेश गायकवाड, पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार,भगवान शिंदे आदी





