जत,प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दि. 2 ऑगस्ट पासून मराठा क्रांती ठोक मोर्चा जत तालुक्याचे वतीने येथील तहसील कार्यालयासमोर मराठा समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.गुरूवारी आंदोलनाचा सातवा दिवस आहे.मराठा आरक्षण देणे आता क्रमप्रात झाले आहे.अंदोलनाने महाराष्ट्र व्यापला असून शासनाने मराठा आरक्षण तातडीने द्यावे असे आवाहन कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांनी यावेळी बोलताना केले.
बुधवारी या ठिय्या आंदोलनात जत पश्चिम भागातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पश्चिम भागातील डफळापूर, बाज,अंकले,जिरग्याळ, मिरवाड, खलाटी गावातील समाज बांधवानी सहभाग नोंदविला.अंदोलनाच्या सहभागासाठी मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांनी आवाहन केले होते.त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.डफळापूरातील भजनी मंडळाचे त्यांना साथ मिळाली. आजपर्यंत या आंदोलनात उपस्थित राहून जत वकील संघटना ,जत मेडिकल असोसिएशन, धनगर समाज , मुस्लिम व लिंगायत समाजातील प्रतिनिधीनी पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला आहे.बुधवारी या ठिय्या आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा जि. प.सदस्य विक्रमसिंह सावंत,नगरसेवक सुजय उर्फ नाना शिंदे,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, पं. स.सदस्य दिग्विजय सुनिल चव्हाण, बाजार मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष साहेबराव गायकवाड, उदय इंगोले(शेठ),माणिक खराडे,भगवान खराडे,तानाजी खराडे,प्रकाश खराडे,रमेश शिंदे,नाना पाटील,प्रताप चव्हाण सहभागी झाले होते. या प्रसंगी डफळापूर येथील भजनी मंडळाचे कार्यकर्ते यांनी भजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन केले.आरक्षण मिळेपर्यत हे अंदोलन चालू राहणार आहे. शासनास जाग यावी यासाठी समाज बांधवानी यात सहभागी व्हावे असे आवाहन सुभाषराव गायकवाड यांनी यावेळी केले.
जत येथील मराठा आरक्षण ठिय्या अंदोलनात बुधवारी जत पश्चिम भागातील समाज बांधवानी सहभाग नोंदविला.





