जत,प्रतिनिधी : दरिबडची ता.जत येथे राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. कायम पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या दरिबडची करांना यामुळे फायदा होणार आहे.या पाणी योजनेच्या कामासाठी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी प्रयत्न केले होते. दरिबडची येथे पाणी टंचाईमुळे दरवर्षी नागरिंकाची वणवण होत होती.या योजनेमुळे त्यातून सुटका झाली आहे. योजनेसाठी मंजूरी मिळाली आहे. लवकरचं या कामाचे टेंडर होणार आहे. येत्या दोन वर्षात काम पुर्ण होऊन गाव भागासह वाड्या-वस्त्यावरील ग्रामस्थांना या योजनेतून प्रत्यक्षात पाणी पुरवठा होणार असल्याचे सरदार पाटील यांनी सांगितले.





