जत,प्रतिनिधी : डोर्ली ( ता.जत)येथील विना परवाना सुरू असलेल्या खडी क्रशर मालकांनी तहसिलदार कार्यालयास खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक आहे. त्या खडी क्रशर मालकाविरोधात 420 कलमानुसार गुन्हा दाखल करावा, तसेच या प्रकाराला पाठिशी घालणाऱ्या मंडल अधिकारी व गावकामगार तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांच्या नेतृत्वाखाली जत तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, या प्रकरणात तहसिलदारांचाही बेजबाबदार झाला आहे. सांगली जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र प्रदूषण विभागाची परवानगी न घेता क्रशरच्या मालकाने बेकायदेशीर खडी क्रशर सुरू केले. तहसिल कार्यालयास खोटी माहिती देवून मंडल अधिकारी व तलाठी यांनीही प्रशासनाची दिशाभूल केली तसेच शासनाची रॉयल्टी बुडवली, त्यामुळे खडी क्रशर मालक व मंडल अधिकारी व तलाठी यांचे संगनमत करून शासनास फसविले आहे.या प्रकरणात बेजबाबदार पणा करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करून त्यांचे निलंबन करावे,जेणेकरून असा प्रकार पुढे कुणाकडून घडणार नाही असे यावेळी मुकेश पवार यांनी सांगितले.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार, कृष्णा कोळी, छगन पवार, सुरेश शिंदे, राजाक्का शिंदे, महादेवी शिंदे, सखाराम पवार, तुकाराम पवार, राजाराम पवार
हे उपोषणात सहभागी झाले आहेत.दरम्यान अशा गौण खनिजातून महसूलची मलई अंवलबून असल्याने तेरीभी चुप,मेरी भी चूप प्रकाराने निसर्गाला आवाहन देत पर्यावरणाची हानी सुरू आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनीच कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
डोर्ली ता.जत बेकायदेशीर खडी क्रशर विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.





