जत | सोमवारी येथे पाणी फाउंडेशन कडून जलरत्नांचा सत्कार समारंभ,मान्यवरांची उपस्थिती

0
5

सोन्याळ,वार्ताहर:सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा 3 अंतर्गत जत तालुका पाणी फाउंडेशन कडून 6 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 11 वाजता श्रमसंस्कार सोहळा अर्थात ‘गौरव जलरत्नांचा समारंभ’  आयोजित करण्यात आला आहे. यात उत्कृष्ट कार्य केलेल्या व सहभागी होऊन योगदान दिलेल्या व्यक्ती व संस्थेचा विविध मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. जत तहसिल कार्यालयाजवळील तलाठी भवनात हा कार्यक्रम होणार  असून तालुक्यातील सर्व जलरत्नानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक तुकाराम पाटील व हिना मुजावर यांनी केले आहे.जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार विलासराव जगताप,सभापती मंगलताई जमदाडे,तहसीलदार अभिजित पाटील, नागेश गायकवाड,गटविकास अधिकारी श्रीमती ए.के. वाघमळे, उपविभागीय कृषी अधिकारी कांतप्पा खोत, तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील,गटशिक्षणाधिकारी बी.एन.जगधने, आर.डी. शिंदे, पोलिस निरिक्षक राजू ताशीलदार, भगवान शिंदे,अॅड.प्रभाकर जाधव, वाटरकप स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक अविनाश पोळ,जिल्हासमन्वयक सत्यवान देशमुख व तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे.
 यावेळी तालुका समन्वयक तुकाराम पाटील म्हणाले की,सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पर्व 3 या स्पर्धेत  जत तालुक्यातील गावातील लोकांना बरोबर घेऊन जलसंधारणाची लोकसहभागातून मोठी कामे केली आहेत. सर्वांना बरोबर घेऊन गाव सन्मानाने उभे करण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसलेले आहे. त्यामुळे विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीनंतरची सर्वात मोठी जलचळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहिली आहे.  या जलचळवळी ला आपण मदत केली, समाजातील एक घटक म्हणून श्रमदान केले, आर्थिक मदत केली, आपणा सर्वांच्या कष्टांचा सन्मान करावा,शुभेच्छा द्याव्यात व पाठीवर शाबासकीची थाप द्यावी व आपण केलेल्या श्रमाचे संस्कार जत तालुक्यातील प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक गावात रुजावे व जत तालुका ” श्रमपंढरी जत” या बिरुदावलीने संम्पूर्ण राज्यात नव्हे तर सम्पूर्ण भारत देशामध्ये ओळखले जावे यासाठी मनाचा “श्रमसंस्कार सोहळा अर्थात गौरव जलरत्नांचा ” या कार्यक्रमात उल्लेखनिय कामे केलेल्या व्यक्ती, संस्थेचा सन्मान करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व जलरत्नानी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन तुकाराम पाटील व हिना मुजावर यांनी केले आहे .

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here