गुगवाड,वार्ताहर:बिंळूर(ता.जत) येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावातील एका पुतळ्याची विटबंना केल्याने शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांनी सर्व समाजाची बैठक घेऊन असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले व शांततेचे आवाहन केल्याने तणाव निवळला.याप्रकरणी रमेश शिवाप्पा माळी,शिवाप्पा मुत्याप्पा माळी यां सशयिंताची नावे स्पष्ट झाली आहेत. रमेश माळी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी नागनगोंडा पाटील यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.
बिंळूरमधील पुतळ्याची विंटबना केल्याचा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यातून गावबंद व रास्ता रोको अंदोलन करण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून शांततेचे आवाहन केले.गावातील सर्व समाजांची बैठक घेतली.असे कृत्य चुकीचे आहे.कोणी केले यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.संशियतांची गावातील चायनीज सेंटरवर पैशाच्या देवाणघेवाणीवरून शुक्रवारी सायकांळी वाद झाला होता.त्यातून धार्मिक तेड निर्माण व्हावा, या उद्देशांनी असे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार, सहा. पोलिस निरिक्षक गजानन कांबळे, सचिन गढवे व कर्मचारी उपस्थित होते.





