जत | महसूल विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्याकडून सत्कार |

0
6

जत,प्रतिनिधी: जत महसूल विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्याकडून सत्कार उकृष्ठ कामगिरी बद्दल सत्कार करून गौरविण्यात आले. जत महसूल विभागातील नायब तहसीलदार जी.एल.शेट्यापगोळ,बिपी मुंगळीकर,लिपिक श्रीमती संध्याराणी पेरके,श्रीमती संजीवनी दहीभाते,शिपाई दत्तात्रय चन्नाप्पा शिंगे व वाहनचालक सिद्दु बोगार यांचा सत्कार करण्यात आला. महसूल विभागात समन्वय सहकार्य व सामाजिक दृष्टिकोन यांचा सुमेळ घालून उल्लेखनीय काम केल्यामुळे या कर्मचाऱ्यांचा महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
शासनाची कोणतीही योजना, उपक्रम तालुक्यातील खेड्या- पाड्यात शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यास महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून राबविल्या जातात.लोकांची कामे योजना लोकप्रिय व यशस्वी करणेसाठी त्यांचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे महसूल विभागाला अभिमानास्पद कामगिरी करून सामाजिक प्रगती साधता येते.
जत उपविभागीय कार्यालयातील शिपाई कर्मचारी दत्तात्रय शिंगे ,
कनिष्ठ लिपिक श्रीमती संध्याराणी पेरके ,जत तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून जी एल शेट्यापगोळ,बिपीन मुंगळीकर,लिपिक श्रीमती संजीवनी दहीभाते व वाहनचालक सिद्दु बोगार यांनी  प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या केलेल्या उत्कृष्ट कामामुळे प्रशासनाचा लौकीक उंचावण्यास मदत झाली आहे म्हणून सन 2017-2018 या महसूल वर्षेमध्ये उल्लेखनीय कामाचा महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळीअप्पर जिल्हाधिकारी अणासाहेब चव्हाण ,निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अमृत नाटेकर, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला, मिरज  उपविभागीय अधिकारी मनोज खरात, विट्याचे उपविभागीय अधिकारी जिरंगे मॅडम आदी उपस्थित होते.

जत प्रांत कार्यालयातील कर्मचारी दत्तात्रय शिंगे यांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी व इतर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here