जत,प्रतिनिधी :शासनाने तातडीने अंदोलनाचा दखल घेऊन मराठा समाजाला त्वरित अरक्षण मिळावे.दुर्लक्षीत असलेल्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून न्याय द्यावा अशी मागणी आ.विलासराव जगताप यांनी केली.ते मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गुरूवार पासून सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या अंदोलन प्रंसगी बोलत होते.मराठा आरक्षण व अन्य मागण्याची अमंलबजावनी सरकारने लवकरात लवकर करावी यासाठी सकल मराठा समाज जत यांच्यावतीने दुसऱ्यादिवशी ही ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे.शुक्रवार या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी जतचे आमदार विलासराव जगताप यांनी भेट दिली.या आंदोलनाच्या ठिकाणी बनाळी येथिल भजनीमंडळ सहभागी झाले होते. या प्रसंगी आमदार विलासराव जगताप यांनी स्व:ता सुरपेटी वाजवून भजनीमंडळाला साथ दिली. तसेच भजनही केले. याप्रसंगी अध्यात्मातील आमदार विलासराव जगतापांचे दुसरे रूपही तालुकावाशियांना पाह्याला मिळाले. यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले,शासनाने सकल मराठा समाजाच्या भावना विचारात घेऊन मराठा समाजाला लवकरात लवकर अारक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्वच बाजूंनी उपेक्षित असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देवून समाज भावनांचा आदर करावा. यावेळी अॅड. प्रभाकर जाधव,मराठा स्वराज्य संघाचे सुभाषराव गायकवाड,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, सुनिल जाधव,नगरसेवक उमेश सावंत. नानासाहेब शिंदे, अजिंक्य सावंत, आबासाहेब सावंत, गणेश सावंत. लक्ष्मण बोराडे,सुधिर चव्हाण, योगेश पाटील, राजेंद्र शिंदे, डाॅ.देवानंद वाघ. डाॅ. महेश भोसले, तसेच बनाळी, शेगाव, वाळेखिंडी येथील समाजबांधव उपस्थित होते.
मराठा आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही ठिय्या अंदोलन करण्यात आले.





