जत | तालुक्यात ग्रामपंचायती,आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभारामुळे साथीचे आजार बंळावले |

0
5

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील सर्वच गावात पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढत असून ग्रामपंचायती,नगरपालिका,आरोग्य विभागाच्या वतीने औषध व धूर फवारणी करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही कामे करण्यासाठी कर्मचार्‍यांची संख्याही कमी आहे. परिणामी सर्वत्र डेंग्यू, मलेरिया, सर्दी व ताप आदी साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. वैद्यकीय विभागाच्या ढिसाळ कारभाराचा तालुक्यातील नागरिकांना फटका बसत आहे.
अडलेले साडपांणी,अनेक गावात गटारीची स्वच्छता नाही. त्यामुळे डासांची संख्या वाढत आहे.नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यात डेंग्यूचे, ताप, मलेरियाचे शेकडो रुग्ण आढळत आहेत.
पावसामुळे शहरातील खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत आहे. अनेक ठिकाणी गटारेही तुंबलेली आहेत. ओसंडून वाहणार्‍या कचराकुंड्यांमुळे डासांचे प्रमाण वाढलेले असते.काही ग्रामपंचायती, जत शहरातील पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध व धुर फवारणी केली जाते. ही फवारणी करण्यासाठी आरोग्य विभागाकडे कर्मचार्‍यांचीदेखील वानवा आहे. दोन ते तीन कर्मचार्‍यांकडून प्रत्येक प्रभागामध्ये धुर फवारणी केली जात आहे. ज्या घरांमध्ये डेंग्यूचा रूग्ण आढळेल त्याच्या घराच्या 100 मीटर परिसरातच धूर फवारणी करण्याचा नियम आहे. अनेकदा या ठिकाणीही धूर फवारणी होत नसल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here