डफळापूरातील बोगस डॉक्टरचा दवाखाना आता बेंळूखीत सुरू आता जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनीच कारवाई करण्याची मागणी

0
4

डफळापूर, वार्ताहर: डफळापूरातील चार पोलिस केस दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचा दवाखाना काही पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने बेंळूखी (ता.जत) येथे सुरू झाला आहे.
बंगाल स्थित एका डॉक्टरने कोणतीही पदवी नसतानाही डफळापूर मध्ये अनेक वर्षापासून बोगस दवाखाना थाटला होता.त्यांच्याकडे कोणतीही पदवी नसल्याने बोगस डॉक्टर विरोधी पथकाने त्यांच्यावर कारवाई केल्याने आतापर्यत चार केसेस दाखल झाल्या आहेत.हा बोगस डॉक्टर नुकताच कारवाईत त्रुटी राहिल्याने कारवाईतून सुटला आहे.प्रंचड पैसे मिळवायची सवय लागलेल्या या डॉक्टरांने आता बेंळूखीतील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपला बोगस दवाखाना सुरू केला आहे.हा दवाखाना सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य विभाग व पोलिसांना पोलिस पाटलाकडून देण्यात आली आहे.जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बोगस डॉक्टर विरोधी समितीला आवाहन देणारा हा बोगस डॉक्टर नेमका तालुका आरोग्य प्रशासनाच्या ढिलाईने परत परत दवाखाना थाटून रुग्णांचा जीवावर उटला आहे.

डफळापुरातील बोगस डॉक्टरांवर आम्ही कारवाई केली आहे. आतापर्यत चारवेळा अशा कारवायानंतरही या बोगस डॉक्टरचा दुसऱ्या गावात बोगस दवाखाना सुरू होत असल्याचे आमच्या कानावर आले आहे.गतवेळी कागदपत्राच्या अडचणीमुळे हा डॉक्टर वाचला आहे.यापुढील कारवाईत बोगस डॉक्टर सापडल्यास बोगस डॉक्टरांबरोबर संबधित घर मालकांवरही कायदेशीर कारवाई करणार आहोत.त्यांना सहअरोपी करता येईल का याबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत.डॉ.डी.जी.पवार,तालुका वैद्यकीय अधिकारी, जत

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here