जत | पोलिस ठाण्यात फिर्यादीचा आत्महत्येचा प्रयत्न |

0
15

जत,प्रतिनिधी:जत पोलिसात ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या एकाने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तातडीने  ग्रामीण रुग्णालयांत दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला. घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सोमनाथ सुरेश रुकडे (वय-33,रा.सातारा)असे त्याचे नाव आहे.
जत पोलिसात रूकडे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सोमनाथ रुकडे हा विषारी औषध पिऊन तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आला होता. कौटुंबिक वादातून शहरातील काही तरूण त्याला त्रास देत होते.त्यांच्या विरोधात त्याला तक्रार द्यायची होती.पोलिस तक्रार घेत असताना त्याला त्रास होऊ लागला, उलट्या होऊ लागल्याने त्याला पोलिसांनी जत ग्रामीण रुग्णालयांत दाखल केले.डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्यांने विषारी औषध पिल्याचे स्पष्ट झाले.त्यांची झडती घेताना त्यांच्या खिशात  कमांडो रॅड पावडर या किटकनाशकाचे पाकिट सापडले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ मिरज येथे हलविण्यात आले आहे.दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सा.पोलिस निरिक्षक सचिन गढवे करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here