डफळापूर, वार्ताहर :जत शहरासह तालुक्यातील अनेक गावात चिकनगुण्या, डेंगूचे थैमान घातले असताना आता डफळापूरात तीन लहानग्यांना डेंगूची लागन झाल्याचे निष्पन्न झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.यापुर्वी भारत संत्तू हजारे यांना चिकनगुण्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या उपचार करण्यात आले आहेत.संबधित यंत्रणेने उपाययोजना कराव्यात अशी मागणी बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण यांनी केली आहे. अस्वच्छता डेंगूचे डास रोकण्यासाठी उपाययोजनात संबधित विभाग कमी पडत असल्याने चिकनगुण्या, डेंगू बळावत आहे.गावातील अनेक गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे साडपांणी आडून राहिल्याने डांसाचे आश्रस्थाने बळांवले आहेत. प्राथमिक तपासणीत मुख्य बाजार पेठ, पार कट्टा,गायकवाड प्लॉट परिसर डास बांधित क्षेत्र बनले आहे.या परिसरातील भक्ती दिपक बंडगर (वय-10),लतिका नविन संकपाळ (वय-5),प्रथमेश विकास शिंदे (वय-10)या तीन लहान मुलांना डेंगू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर मिरज येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.त्यांची प्रकृत्ती आता स्थिर आहे.यांच्याशिवाय या परिसरातील अनेक नागरिक तापाच्या साथीचे शिकार झाले आहेत.दरम्यान बुधवारी या रुग्णांना डेंगू झाल्याचे निष्पन्न होताच ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून गावचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.
डांसाचे उत्पती रोकण्यासाठी आरोग्य विभाग,ग्रामपंचायती कडून उपाययोजना करणे गरजेचे होते.गेल्या महिंन्याभरापासून तापाचे रुग्ण वाढत असूनही दुर्लक्ष झाल्याने डेंगूचा फैलाव वाढला आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा अंदोलन करावे लागेल असा इशारा बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण यांनी शेवटी दिला आहे.
दरम्यान डेंगू झाल्याचे निष्पन्न झाल्याने तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. गायकवाड प्लॉट मधिल सांडपाणी प्रवाहित करण्यात आले आहे.त्याशिवाय गावातील सांडपाणी अडून राहिलेली ठिकाणे स्वच्छ करण्यात येत आहे.प्राथमिक उपाययोजना म्हणून औषधे फवारणी आज पासून सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांना लॉऊडस्पिकर द्वारे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.