जत,प्रतिनिधी : सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र कार्यालयाने गेल्या वर्षभरात मापात पाप व उद्घोषणा केलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा जादा किंमत आकारणी केलेल्या व्यापाऱ्यांवर कधी उचणार कारवाईचा बडगा असा प्रश्न जत तालुक्यातील ग्राहकांतून उपस्थित होत आहे. साधे किराणा दुकानापासून पेट्रोल पंपा पर्यत तालुक्यात सर्रास माफात पाप होत आहे.राज्यात सर्वत्र माफात गोलमाल होत असताना जत तालुक्यात संबधित विभाग मात्र गांधारीच्या भुमिकेत दिसत आहे. त्यामुळे बेधडक सर्वकाही सुरू आहे.पेट्रोल पंप, सोनार, किराणा, धान्य, हार्डवेअर, दूध विक्रेते, केमिकल विक्रेते, सहकारी संस्था, मॉल, उद्योग, आदींचा समावेश आहे. काटा दांडी, इलेक्ट्रॉनिक डिजिटल वजने तपासणीचा विभाग वर्षातून एकदाच तपासणी करताना दिसतो.इतरवेळी सर्वत्र अलबेल असल्याचे चित्र आहे.
कायद्यानुसार वजनाबाबत उल्लंघन आढळल्यास कार्यालय वस्तू, वजनमापे जप्त करू शकतात. नव्याने काटा खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांना एक वर्षानंतर पडताळणी मुद्रांक करून घेणे अनिवार्य असते.





