संख बलात्कार, खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या : समता सैनिक दल,यशसिद्दी आजीमाजी सैनिंक संघटना

0
14

सोन्याळ,वार्ताहर: संख (ता.जत)येथील चर्मकार- ढोर समाजाच्या युवतीवर सामुहिक पाशवी बलात्कार करुन क्रूरपणे गळा आवळून खून करण्यात आला आहे. या अमानवी कृत्याचा समता सैनिक दल सांगली, यश सिद्दी आजीमाजी सैनिंक वेलफेअर संघटनांच्या वतीने जाहिर निषेध करून खुन्याना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.संखपासून एक किलोमीटर दूर ऊसाच्या शेतात विवस्त्रावस्थेत युवतीचा मृतदेह आढळून आला होता. तिचा गळा आवळून खून झाल्याचे व खुनापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी उमदी पोलिसांनी दोन नराधमांना ताब्यात घेतले आहे.मयत सविताचा भाऊ लक्ष्मण संताराम सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद क्रमांक 57/2018 दिनांक 09/07/2018 भादवि कलम 376 (अ), (1), 302 आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.अध्यक्ष सुभेदार मेजर गणपती पाखरे यशसिद्धी आजी माजी सैनिक वैल्पेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य व समता सैनिक दल यांनी निषेध व्यक्त केले. संख येथे समता सैनिक दल सांगलीचे माजी सैनिक दत्तात्रय शिंदे अध्यक्षतेखाली व पदाधिकारी व कार्यकर्ते पिडित कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा व सांत्वन करण्यात आले.यावेळी महार रेजिमेंटचे आजी माजी सैनिक उपस्थित होते. खुन्यातील अरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सांगली जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी सांगली,पोलिस अधीक्षक सांगली यांना निवेदन देण्यात आले आहे. यश सिद्धी आजी माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य तथा समता सैनिक दलाचे  कंमाडर इन चिफ  कँप्टन वंसतराव म्हस्के मुंबई यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केले आहे.

संख बलात्कार, खून प्रकरणातील आरोपींला फाशी व्हावी या मागणीचे निवेदन समता सैनिक परिषद व आजी माजी सैनिक संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here