डफळापूर | गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयात अस्वच्छता |

0
4

 डफळापूर,वार्ताहर: डफळापूर गावच्या स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयात अस्वच्छता असल्याने शहाणपण शिकवायचे कुणाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुमारे 15 हाजार लोकसंख्या असलेल्या डफळापूरात स्वच्छतेबाबत उदाशीन दिसत आहे. ग्रामपंचायतीकडे कर्मचाऱ्यांचा ताफा कार्यरत आहे. त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी ग्रामसेवकांवर जबाबदारी आहे.मात्र गावातील गटारी,रस्ते,सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता होत नसल्याचे सदस्याकडून ग्रामपंचायतीला सतत तक्रारी येत आहेत. प्रभाग एकमध्ये तुंबलेल्या गटारी स्वच्छ कराव्यात म्हणून ग्रा.पं.सदस्य मुरलीधर शिंगे यांनी ग्रामसेवकांना सांगूनही कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे. असे प्रकार सतत घडत आहेतचं.त्यापुढचा कहर म्हणजे जेथून गावचा गाडा चालविला जातो,त्या ग्रामपंचायत कार्यालयातील स्वच्छतागृह गेल्या कित्येक दिवसापासून स्वच्छ केले नसल्याने विष्ठाही तशीच पाण्यावर तरंगताना दिसते.त्यांची दुर्गंधीही येत आहे.तेथेच बसणाऱ्या ग्रामसेवक आण्णासाहेबांना हे दिसत नाही.हे विशेष..
ते कधी येतात व कधी जातात यांचीही वेळा निश्चित नसल्याचे ग्रामस्थांना हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे.आलेल्या ग्रामस्थांना काय हवं आहे.हेही विचारण्यात येत नाही. बऱ्यांच वेळा नागरिंकाना ग्रामसेवक आण्णासाहेबांची मर्जीनुसार काम करावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नेमके गावातील प्रश्नासाठी काम होणे अपेक्षित अाहे.तसे पदाधिकारी विजयी होताना आश्वासने दिली आहेत. मात्र त्याबाबत कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे.

डफळापूर ता.जत येथील ग्रामपंचायत कार्यालयातील अस्वच्छ स्वच्छतागृह हिवरेबाजारकडे नेहणार का?

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here