जत,प्रतिनिधी:सायकांळ नंतर जत शहरातील शासकीय कार्यालये,इमारती तळीरामांची आश्रयस्थाने बनत आहेत.अगदी दिवसाढवळ्या सुध्दा दारू पार्ट्या रंगत आहेत.शासकीय इमारती,वनविभागाची दुर्लक्षीत कार्यालये,सार्वजनिक ठिकाणी आडोसा बघून असे प्रकार बेधडक सुरू आहेत. अशा तळीरामांना सामान्य नागरिकांनी विचारणा केल्यानंतर विचारणाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा ते प्रयत्न करत अाहेत. अशा प्रकाराने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणाची सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मद्यापींचा त्रास नागरिकांना होत असल्याचे चित्र आहे.





