संख | बँक अॉफ महाराष्ट्र संख शाखेचा शेतकरी मेळावा संपन्न |

0
5

संख,वार्ताहर : संख (ता.जत ) येथील बँक अॉफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने पिक कर्ज मेळाव्यात घेण्यात आला.या मेळाव्यात 15 शेतकऱ्यांना 19 लाख कर्जांचे वाटप करण्यात आले.या मेळाव्यात नविन 58 शेतकऱ्यांनी नविन कर्जासाठी 70 लाख रूपये मागणी केली आहे.
यावेळी शाखाधिकारी आर.बी.अमिनभावी,शेती अधिकारी विजय जाधव,एस.एम कांबळे,गिरमला पिरशेट्टी शेतकरी उपस्थित होते. गरजू शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने पिक कर्ज वाटप करण्याच्या सुचना राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात आल्या आहेत.त्याअनुषंगाने संख येथील बँक अॉफ महाराष्ट्राच्या वतीने गतीने कर्ज मंजुरी व शेतकऱ्यांच्या अडचणी समजावन घेण्यात आल्या. शाखाधिकारी अमिनभावी म्हणाले, कर्ज वाटप व नविन प्रस्ताव तयार करून कर्ज मंजूरीची मागणी शासनाकडे केली आहे.
तसेच मागच्या वर्षीही कर्ज माफ झाले आहे. सद्या पिक कर्ज,दिर्घ मुदत कर्ज,नविन कर्ज, शेती पुरक जोड व्यवसाय गाय, शेळी ,तात्काळ कर्ज ,कृषी संलग्न योजनांना कर्ज वाटप सध्या चालू आहे.त्यांचा परिसरातील शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन शेती अधिकारी व शाखा अधिकारी यांनी शेतकऱ्यांना केले.त्याशिवाय दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना एका गायसाठी पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जादा कर्ज बँकेकडून देण्यात येत आहे.

संख ता.जत येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने शेतकरी मेळावा संपन्न झाला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here