कोसारी, वार्ताहर : सध्या प्रधानमंत्री पिक विमा योजना चालू आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रे गोळा करतानाच दमछाक होत आहे. त्यातच राष्ट्रीयकृत्त व सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याने शेतकर्यांची डोकेदुखी वाढली आहे.
शेतकरी पिक विमा भरण्यासाठी कागदपत्रे जुळवाजुळव करून मेटाकुटीला आला आहे
तर दुसरीकडे बँकेत पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक व हेळसांड केली जात आहे.विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त वेळ थांबण्यास सांगतात,तर तपासणी करून देते वेळेस माहिती व्यवस्थित दिली जात नाही.त्यामुळे शेतकरी वैतागला आहे.शासन म्हणते पिकविमा भरा तर दुसरीकडे बँकां,तलाठी शेतकऱ्यांचे हाल करत आहेत. त्यामुळे सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.





