जत,प्रतिनिधी : मानसिक,शारिरिक,सामाजिक आरोग्य चांगले रहावे यासाठी लायन्स क्लबचे योगदान समाजासाठी करत आहोत.लायन्स क्लब ही संघटना समाजासाठी काम करत आहेत. असे प्रतिपादन डॉ. रविंद्र आरळी यांनी केले. ते लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शपथविधी संभारभात बोलत होते. लायन्स क्लबच्या नविन पदाधिकारी पदग्रहण व शपथविधी संभारभ उमा नर्सिग कॉलेज हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थितीत गोपाल बजाज,ए.एम.यशवंत,रविंद्र टिंगरे,भाजपा नेते झोन चेअरमन राजेंद्र आऱळी,चंद्रकात गुड्डोडगी, राजेंद्र माळी उपस्थित होते.यावेळी लायन्स व लायनेऩ्स क्लब जतचे झोन चेअरमन राजेंद्र आऱळी, जतचे नव्या पदाधिकाऱ्यांचे निवडीबद्दल सत्कार यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी डॉ. रविंद्र आरळी,म्हणाले,तालुक्यातील मोठे योगदान आहे. लायन्स 22 वर्षात क्लबच्या इंग्लिश स्कूलद्वारे शैक्षणिक,धनलक्ष्मी पतसंस्थेद्वारे आर्थिक, क्लबच्या माध्यमातून समाजकार्य अशी त्रिसुत्रीप्रमाणे हा क्लब कार्यरत आहे. दुष्काळी जत तालुक्यात आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरे, विविध पुरस्कार दिले,दुष्काळी परिस्थिती शालेय विद्यार्थ्यासाठी पाण्याच्या टाक्याचे वितरण केले. लायन्स क्लबचा वतीने आम्ही इग्लिंश मिडियम स्कूलच्या माध्यमातून इग्लिंश शिक्षणाची सोय केली, पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांना आर्थिक मदत मिळवून दिली आहे.क्लबच्या वतीने ब्लड बँक कार्यरत आहे.येथे रुग्णांना लाभ होतो. लायन्स संघटना जागतिक पातळीवर विशेष संस्था बनली आहे.दरवर्षी नवे अध्यक्ष निवडत नेतृत्वांला संधी दिली जाते.त्यांच्याकडून वर्षभर सामाजिक उपक्रम राबवून क्लबचा नावलौकिक वाढविण्याचे काम केले जाते.असे डॉ. आरळी शेवटी म्हणाले.
फोटो
जत येथील लायन्स क्लबच्या नविन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शपथविधी संभारभात दिप्रज्वलन करताना मान्यवर





