जत | यल्लमा देवी मंदिर ते लोखंडी पूल नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ |

0
26

जत,प्रतिनिधी : जत शहरातील यल्लमा देवी मंदिर ते लोखंडी पूल नाला खोलीकरणाचे काम कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सुरु करण्यात आले. या कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विभागीय कृषी अधिकारी कांतप्पा खोत,नायब तहसीलदार शेट्यापगोळ,माजी सभापती प्रकाश जमदाडे,सुनील भैय्या पवार, आप्पासाहेब पाटील, जतचे पोलीस पाटील, जत नगर परिषदेचे नगरसेवक, व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्याम कंठी(ता.जत) येथील ओढापात्रामध्ये नाला खोलीकरणाचे काम कृषी विभागामार्फत सुरु करण्यात आले. याही कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  रावसाहेब मोटे,कंठी गावचे सरपंच प्रकाश ऐवळे, उपसरपंच सौ.सखुबाई मोटे, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

जत शहरातील नाला खोलीकरण कामाचे आ.विलासराव जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here