शेगाव वार्ताहर :आवंढी ता.जत येथे मराठा आरक्षण व विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत दिवसभर गावातील सर्व दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला,तसेच रस्त्यावरती टायर पेटवुन जत ते सांगोला हा रस्ताही सुमारे दोन तास रोखुन धरला.यावेळी तरुण कार्यकर्ते, नारिक व शाळकरी मुलांनी रस्त्यावरच ठिय्या मारुन सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनास्थंळी पोलिस निरिक्षक राजु ताशिलदार यांनी भेट देऊन आंदोलकांचे मत जाणुन घेत, लेखी निवेदनही स्विकारले. उपसरपंच डॉ. प्रदिप कोडग, तटामुक्त आध्यक्ष हरिबा कोडग,महेश कोडग,ग्रा.पं.सदस्य आण्णासाहेब बाबर,सतिशभाऊ कोडग,रामचंद्र कोडग,युवक नेते राजु कोडग,अमोल पाटील,हरिशचंद्र कोडग, बापूसो तोरणे,सुर्यकांत कोडग,ग्रामस्थ व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





