जेथे चुकते तेथे उपोषण करू,
जत,प्रतिनिधी : जेथे चुकते,जनतेवर अन्याय होतो,तेथे उपोषण करूचं, आम्हाला कोणी शहाणपण शिकवू नये असा टोला आ.विलासराव जगतापांनी यांनी लगावला.पोलिसाच्या हप्तेगिरीमुळे तालुक्यातील पुर्व भागात अवैद्य बंळावले आहेत.अनेक सराईत गुन्हेगार राजकीय झालर पाघंरून दहशत निर्माण करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा व मराठा,धनगर,लिंगायत समाजाला आरक्षण द्यावे,तुकाराम सरगर लवंगा ता.जत यांच्या खूनातील आरोपींना अटक करावी यासह अन्य मागण्यासाठी जतचे आमदार विलासराव जगताप व भाजपचे पदाधिकाऱ्यांनी शनिवारी जत तहशील कार्यालया समोर लाक्षणीक उपोषण केले.यावेळी बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, भाजपा नेते डाॅ.रविंद्र आरळी,पंचायत समिती जत सभापती सौ मंगलताई जमदाडे,जि.प.सदस्य सरदार पाटील. चंद्रकांत गुड्डोडगी,श्रीपाद अष्टेकर यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले की,अवैध धंद्यांमुळे गुंडगिरी वाढली आहे. गुंडाकडून दहशत माजवून खंडणी गोळा करणे,खून करणे असे प्रकार घडत आहेत. दहशतीने निवडून येऊन समाजामध्ये अशांततेचे वातावरण पसरविले जात आहे.यामुळे जनता दबावाखाली आहे.त्यांच्यावर दहशत माजविली जात आहे. तालुक्यात पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने पुर्व भागातील गावागावात अवैध धंद्ये बेधडक सुरू आहेत. त्यातून आलेल्या पैशातून गुंडगिरी बंळावली आहे.काहीजण दहशत करून हप्ते गोळा करत आहेत. हाच पैसा निवडणूकीत वापरला जात आहे. अशाने अशांततेचे वातावरण तयार झाले आहे.जवळपास सर्व धंदे पोलिसाच्या सहकार्याने सुरू आहेत. त्यात त्यांना मोठ्या आकड्याचे हप्ते मिळतात.त्यामुळे ते अशाना पाठिशी घालत आहेत.कारवाई होत नसल्याने गुंडाराज वाढले आहे.वर्षभरापुर्वी झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नवनाथ उत्तम जगताप यांना मारहाण करून काही जणांनी दहशत माजवली होती.ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान शिवा करे व त्याचा भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.मी आमदार म्हणून स्वतः याची माहिती पोलिसांना दिली.थेट गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्यांचीही माहिती पोलिसांना दिल्यानंतरही पोलिसाकडून कारवाई होत नाही. उलट त्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्योग उमदी पोलिसांमार्फत सुरू आहे.आमदार जगताप म्हणाले,जालीहाळ,दरीबडची, सिद्धनाथ येथील नागरिकांवर दहशत माजवत त्याना मारहाण करणाऱ्या अनेक घटना घडलेल्या आहेत.याबाबत तक्रारीवरही पोलिसाकडून कारवाई होत नाही.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आमदार जगताप यांनी दिला.आमदार जगताप म्हणाले,जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांना मुंबई येथे माझ्यासमोर राज्य गृहमंत्री दीपक केसरकर यांनी दूरध्वनी वरून घटनेची माहिती देऊन कारवाई करण्याची सूचना दिल्या, माञ पोलिस अधिक्षक सोहेल शर्मा हे मला दूरध्वनी आला नाही,असे सांगत खोटे बोलतात असा गंभीर आरोप आमदार जगताप यांनी यावेळी केला.निगडी खुर्द येथील व सध्या कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या नानासो चंदनशिवे हा पोलीस मी एलसीबीचा पोलीस आहे,असे सांगून गावातील नागरिकांना त्रास देण्याचा उद्योग सुरू आहे. त्या भागातील वाळू,व इतर अवैद्य धंदे चालकांकडून बिनधास्त हप्ते गोळा केले जात आहे. यांची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडे निगडी खुर्द येथील ग्रामस्थांनी केली.तरीही कारवाई होत नाही.काँग्रेस पक्षाचे नेते विक्रम सावंत व राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे हे ऊठसूट माझ्यावरती पत्रकार परिषद घेऊन आरोप करतात.त्यांना आमदारावर आरोप करून आमदार झाल्यासारखे वाटत असावे त्यामुळे असे उद्योग ते करतात. या दोन्ही नेत्यामुळे तालुक्यात गुंडगिरी फोफावली आहे. काँग्रेसचे विक्रम सावंतांनी कोणतेही विधायक काम केले नाही.कोणत्याही कामाची कोणती माहिती नाही.यांची फक्त गुंडगिरी चालते मात्र आम्ही आवाज उठवल्यानंतर आमच्यावर आरोप करण्याचा धंदा त्यांनी बंद करावा. तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक ठिकाणी अवैध धंदे हे विक्रम सावंत यांच्या बगलबच्च्यांची अवैध धंदे आहेत त्यांनी स्वत: जत येथील तहसीलदार कार्यालयात लावलेला वाळूचा ट्रक पळविला होता. विक्रम सावंत व सुरेश शिंदे याची सत्ता जत नगरपालिकेत आहे. त्यांनी काय दिवे लावले आहेत हे जत शहरातील नागरिकांना माहीत आहे.जत शहर प्रचंड अस्वच्छ झाले आहे सर्व रस्त्यावर चालणेही अवघड झाले आहे असून याकडे लक्ष द्यायला मात्र त्यांना वेळ नाही सत्ता असो किंवा नसो जिथं चुकते तेथे मोर्चे हे काढणारच आम्हाला कोणी शाहणपणा शिकवण्याची गरज नाही. असा सणसणीत आरोप विलासराव जगताप यांनी यावेळी केला.
जत येथे तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आ. विलासराव जगताप,प्रकाश जमदाडे,डाॅ. रविंद्र आरळी व भाजपचे पदाधिकारी





