जत,प्रतिनिधी: सांगली जिल्हा परिषदेचे सभापती तम्माणगोंडा रवीपाटील यांनी जाड्डरबोबलाद येथे दहशत करत कॉग्रेसचे नेते महादेव अंकलगी यांच्या सह अन्य कार्यकर्त्याना मारहाण केली आहे. अशा दंगेखोर सभापती वर कडक कारवाई करून त्यांनी सभापती पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हा बँक संचालक विक्रमसिंह सांवत,तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी पत्रकार बैठकीत केले.
ते म्हणाले,जाड्डरबोबलाद येथे दोन दिवसापुर्वी कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी किरकोळ कारणावरून घराजवळ जाऊन काठी,कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले आहे. या मारहाणीत जखमीवर सांगलीत उपचार सुरू आहेत.याबाबत उमदी पोलिसांनी गुन्हा दाखल न करता उलट कॉग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस भाजपचे नेते तम्माणगोंडा रवीपाटील यांच्या दबावाला बंळी पडत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची गंभीर दखल घेऊन उमदी पोलिसाच्या कडून तपास काढून त्रयस्थ अधिकाऱ्यांकडे द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील शिक्षणाचा बट्याघोळ चालू आहे.अनेक शाळा शिक्षकाविना आहेत.त्याकडे सभापती लक्ष देत नाहीत.गावात किरकोळ कारणावरून मारामारी करण्यात त्यांना रस आहे.यांचा तालुक्यातील कॉग्रेस निषेध करत असल्याचे सांवत व बिराजदार यांनी सांगितले.
Home Uncategorized जत | कॉग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दंगेखोर सभापतींनी राजीनामा द्यावा ;विक्रमसिंह सांवत...





