जत | आमदारांचे आज उपोषण |

0
4

जत,प्रतिनिधी: जतचे आमदार विलासराव जगताप पोलीस प्रशासनाच्या विरोधात आज  लाक्षणीक उपोषणास बसणार आहे. जत तालुक्यातील बळावलेली गुन्हेगारी,हप्तेबाज पोलीस अधिकाऱ्यांच्या मुळे तालुक्यातील कायदासुव्यस्था बिघडली आहे. त्यांच्या निर्षेधार्थ हे उपोषण तहसील कार्यालया समोर होणार आहे.त्यात भाजपच्या पदाधिकारी, कार्यक्रर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ.जगताप यांनी केले आहे.

मराठा,धनगर,व इतर समाजाच्या आरक्षणासंबधीचे प्रश्न तातडीने सोडवावेत.नवनाथ तुकाराम सरगर रा.लवंगा यांच्या खुनाचा तपास करावा,अरोपींना त्वरीत अटक करावी,हा खून दडपणाऱ्यांना अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तलवार व गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या गुंडावर कारवाई करावी, पोलिस अधिकाऱ्यांनी हप्ते घेऊन चालणारे अवैद्य धंदे बंद करावेत.पोलिसाच्या साटेलोटेमुळे गुंडगिरी वाटत आहे.त्यावर कारवाई करावी,शैक्षणिक, गुणवत्ता व आर्थिक मागासलेपण यांचाही आरक्षणासाठी विचार करावा या मागण्यासाठी हे लाक्षणीक उपोषण होणार आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here