जत,प्रतिनिधी: कोसारी ता.जत येथील एका अल्पवयीन मुलीला झुडपात नेहून अति प्रंसग करणाऱ्या तरुणांला हुसकावून लावत पिडित अल्पवयीन मुलीची सुटका करणाऱ्या निडर युवकांचा डिवायएसपी अजयसिंह निंबाळकर,पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार यांच्याकडून सत्कार करून गौरव करण्यात आला.
कोसारी येथे शाळेला आलेली अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना त्यांच्या नात्यातील बाबासाहेब मधू करांडे (वय-19,रा.कोसारी)यांने तिला दुचाकीवर बसवून कासलिंगवाडी येथे घेऊन गेल्या.पिडित मुलीला करांडे यांने तलावाकडे नेहण्याचा प्रयत्न केला.मात्र पिडित अल्पवयीन मुलीने येण्यास नकार दिल्याने तिला खांद्यावर उचलून घेऊन जात असताना मुलीने आरडाओरडा केला. लगत शेळ्या चरवत असलेल्या तरूण अमोल सांगोलकर यांने प्रंसगावधान राखत तिकडे पळत गेल्या,असता बाबासाहेब करांडे अल्पवयीन मुलीला विहिरीत घेऊन जात तिला विवस्ञ करत अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न करताना आढळला.अमोल सांगोलकर यांने बाबासाहेब करांडे या हाटकत काय करतोय म्हणून दरडावले असता.बाबासाहेब पिडित मुलीला सोडून पळला.दरम्यान अमोल सांगोलकर यांने पिडित मुलीची सुटका केली.व तिला घरी आणून सोडले. याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे. पंरतू जर अमोल सांगोलकर तेथे वेळीच गेला नसता तर मुलीवर जबरदस्तीने अतिप्रंसग करण्यात आला असता. त्यापुढेही भितीने संशियतांकडून मोठा अनर्थ घडू शकला असता.पंरतू अमोल सांगोलकर यांने प्रंसगावधान राखत केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या सारखे तरूण आहेत.म्हणून अशा घटनाना पायबंध बसत आहे.असे यावेळी डिवायएसपी अजयसिंह निंबाळकर यांनी सांगितले. आम्ही गुन्हा दाखल केला आहे.संशियत अरोपीच्या मुसक्या आवळू असेही निंबाळकर यांनी सांगितले.
यापुढे अल्पवयीन मुली,मुले कोणत्याही संशास्पद वाटणाऱ्या नातेवाईका बरोबर पाठविण्याबाबत खबरदारी घ्यावी,अनेकवेळा जवळच्या माणसाकडून चुकीचा प्रकार घडू शकतो.नाहक काही घटनात जीव गमवायची वेळ आली आहे.त्यामुळे पालकांनी सतर्क रहावे असे पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार यांनी सांगितले.दरम्यान गुन्ह्याचा तपास महिला सा.पोलिस निरिक्षक डोंगरे यांच्याकडे दिला आहे. त्या पुढील तपास करत आहेत.
जत : कोसारी येथील अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अतिप्रंसगातून तिची सुटका करणाऱ्या तरूण अमोल सांगोलकर यांचा सत्कार करताना डिवायएसपी अजयसिंह निंबाळकर, पो.नि.राजू तासीलदार, सा.पो.नि.डोंगरे





