जत | म्हैशाळ सिंचन योजनेची वेळेत कामे पूर्ण करा : आमदार विलासराव जगताप |

0
4

जत,प्रतिनिधी:जत तालुक्यातील म्हैशाळ सिंचन योजनेची रखडलेली कामे तातडीने पुर्ण करा,येत्या वर्षभरात शेवटच्या टोकापर्यत पाणी पोहचेल असे नियोजन व्हावे अशा सुचना आमदार विलासराव जगताप यांनी म्हैशाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तालुक्यातील म्हैशाळ योजनेच्या कामासंदर्भांत विश्रामगृह जत येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.ही बैठक आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.यामध्ये  म्हैसाळ योजने विषयी चर्चा करण्यात आली,विविध अडचणी,समस्या जाणून घेण्यात आल्या. योजनेची खोदकामाची 85 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित सहा महिन्यात पूर्ण होतील अशी माहिती कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी यावेळी दिली.
  आमदार विलासराव जगताप यांनी मुख्य कॅनाल,पोट कॅनाल ,अस्तीरकरण ,जलसेतू,व या योजनेपासून वंचित नवीन पूर्व भागातील माडग्याळ गावासह आठ सर्वेक्षणची माहिती घेतली.मुदतीत काम करण्याची सुचना दिल्या.वेळेत कामे न करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी,तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जत मुख्य कालवा जोडून दोडानाल्ला ,संख ,गुड्डापूर तलावात पाणी सोडल्यास अनेक गावाचा प्रश्न  मिटणार आहे,कॅनाल संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर तातडीने योग्य तो तोडगा काढणेचे ठरले.
        या बैठकीला सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रकाश जमदाडे,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,पंचायत समिती सभापती सौ.मंगल जमदाडे,जिल्हा परिषद सदस्य सौ.रेखा बागेळी,आप्पासाहेब नामद,शिवाप्पा तावशी,विष्णू चव्हाण,सौ.श्रीदेवी जावीर,सौ.कविता खोत यांच्यासह प्रमुख शेतकरी उपस्थित होते.

फोटो:जत येथे विश्रामगृहात म्हैसाळ सिंचन योजनेच्या कामा संदर्भात बैठक पार पडली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here