नेतृत्व दोन प्रकारची असतात.जशी भगवंताची मुर्ती. मुर्ती अशी असते की,त्यात देवाच्या आकृतीचा भास होतो.म्हणून त्या पाषाणाला मुर्तीपणा प्राप्त होते.तशाच जडणघडणीतील कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना सामान्य घरातून आलेल्या एका युवकांने अर्थकरणाची नाडी ओंळखून उभारलेले अर्थसाम्राज्य पुढे अनेक हातांना बळकंटी देणार ठरले आहे.अशा साम्राज्याचे युंगधर,दृष्टे नेते,तडफदार,कृत्तीशील,सर्वस्
डफळापूर सारख्या छोट्या खेड्यात पतसंस्था उभारणीचे मोठे धाडस बाबासाहेब माळी यांनी 5 जून 2002 ला केले.प्रांरभी त्यांच्या या धाडसाला विरोध झाला,दखल घेतली नाही.काळही तसाच होता.कशीबशी थोड्या खातेदारांवर संस्थेचा कारभार सुरू होता.संस्थेची दीर्घ काळ बाबासाहेब माळी यांच्या कडे धुरा आहे.कोणताही अनुभव,आर्थिक पाठबंळ नसतानाही कुशल नेतृत्व गुणामुळे संस्थेचा वृक्ष वाढला,अगदी चार-पाच वर्षापुर्वी संस्थेला खरा आकार आला.नेतृत्व चांगले असेलतर काहीही अशक्य नसते.हे बाबासाहेब माळी यांनी दाखवून दिले.अगदी हाजाराच्या भांडवलात सुरू झालेली दत्त पतसंस्थेचा आज चार शाखेत विस्तार झाला आहे. हाजारांची संस्था आज 100 कोटीची उलाढाल करत आहे.संस्थेचे भव्यदिव्य,अत्याधुनिक,मुख्य कार्यालयाही पुढील महिन्यात स्वता:च्या नव्या इमारतीत सुरू होणार आहे.
संस्थेचे चेअरमन म्हणून काम करताना बाबासाहेब माळी यांनी स्वत: संस्थेच्या कामात पुर्ण वेळ वाहून घेतले आहे. कर्ज वितरण, वसूली,बचत ठेव,ठेवी यापासून संस्थेच्या सर्व विभागात त्याचे पुर्णवेळ लक्ष असते.त्यामुळेच आज तालुक्यातील अर्थकरणातील महत्वाचा टप्पा पुढील काही वर्षात दत्त पतसंस्थेकडे असेल आणि त्यात बाबासाहेब माळी यांचा सिंहाचा वाटा असेल एवढे निश्चित…
तालुक्यातील सभासदाच्या विश्वासपात्र ठरलेल्या दत्त पतसंस्थेच्या माध्यमातून सामान्य गरजू व्यापारी,व्यवसायिकांना अर्थपुरवठा करून सक्षम करण्यासाठी या संस्थचे माडग्याळ येथे नुकतीच चौथी शाखा सुरू झाली आहे. अगदी दोन महिन्यात या शाखेतून एक कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.जवळपास पंचवीस बेरोजगार तरूणांना यामुळे रोजगार उपलब्धं झाला आहे. जिल्हा बँक संचालक तथा जि.प.सदस्य विक्रमसिंह सांवत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांनी संस्थेला यशोशिखरावर पोहचविले आहे.
5 जून 2002 ला अगदी अल्प भांडवलात सुरू झालेल्या या संस्थची आजची वार्षिक उलाढाल 95 कोटी 21 लाख रुपये झाली आहे. संस्थेला 2017-18 मध्ये 63 लाख 556 रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.5157 सभासद असलेल्या संस्थेच्या डफळापूर मुख्य शाखा,कवटेमंहकाळ शाखा,तसेच सलग्न संस्था असलेल्या सिध्दिविनायक पतसंस्था जत या तिन्ही शाखा सतत शंभर टक्के वसुली,नफ्यात सुरू आहेत.संस्थेच्या चौथी शाखा जत पुर्व भागातील व्यापारी,छोटे उद्योजक व सामान्य जनतेसाठी कार्यरत झाली आहे.
सोळा वर्षापुर्वी एका सामान्य युवकांनी संस्था काढण्याचे धाडस केले होते.त्यावेळी अनेक अडचणी,आर्थिक ससेलोट,कोणतीही अनुकूल परिस्थिती नसतानाही निव्वळ संस्थापक चेअरमन बाबासाहेब माळी यांच्या कृतृत्वाने संस्थेला आज हे वैभव प्राप्त झाले आहे. संस्थेच्या सध्या चार शाखात मिळून 55 बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळाले आहे. त्याचबरोबर हाजारो व्यवसायिक,छोटे उद्योगांना कर्जपुरवठा करून त्यांना उभारी देण्याचे काम संस्थेने केले आहे. गेल्या सोळा वर्षात हाजारो व्यवसायिकांची अर्थवाहिनी म्हणून श्री.दत्त पतसंस्थेला नावलौकिक मिळाला आहे. जेथे बँकाना जमले नाही तेथे दत्त पतसंस्थेने करून दाखविले आहे.डफळापूर, कवटेमंहकाळ, जत परिसरातील अनेक व्यवसायिकांना आधार ठरणारी ही संस्था आज माडग्याळ शाखेच्या माध्यमातून तालुकाभर कार्यक्षेत्र विस्तारले आहे.या मागे मजबूत पणे करणारे बाबासाहेब माळी हे महत्वाचे हस्ती म्हणून नावारूपास आले आहेत. त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना आभाळभर शुभेच्छा…
संस्थेच्या नावलौकिकात भर घालणारी संस्थेची प्रशासकीय इमारात लवकरचं सेवेत दाखल होत आहे.
जत तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठे गाव असणाऱ्यां डफळापूर ग्रामपंचायत निवडणूकीला रंग येत आहे. त्यात अनेकांनी मी निवडणूक लढविणार असे पवित्रा घेतलेले आहे. मात्र, त्यातून चर्चेत नसणारा एक चेहरा ऐनवेळी समोर येत आहे.ऐनवेळी कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांच्या शंब्द शिरसंवाद्य मानत ग्रामपंचायत निवडणूक लढविली, जिंकलीही.त्याचे उपसंरपच पद ऐनवेळी दगाफटका झाल्याने चुकले.मात्र भविष्यातील राजकारणात प्रंबळ दावेदार म्हणून बाबासाहेब माळी समोर आले आहेत.दत्त पंतसस्थेचे चेअरमन डफळापूरातील चर्चेत चेहरा म्हणून बाबासाहेब माळी यांच्या कडे पाहिले जाते. जत,डफळापूर,माडग्याळ, कवटेमहांळ तालुक्यात दत्त पंतसस्थेचा शाखा विस्तार करून अनेक व्यापारी,शेतकरी, नव युवकांना अर्थ पुरवठा करत त्यांनी उभा करण्याचे काम केले आहे. दत्तसह जत येथे दुसरी सिध्दीविनायक पतसंस्था काढत डफळापूरातील पन्नासवर बेरोजगार युवकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्धं करून दिला आहे.त्याचबरोबर जिरग्याळ येथे दुध संकलन केंद्र सुरू करून अल्पवधीत शेकडो शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळवून दिला आहे. अनेक शेतकऱ्याना अर्थपुरवठा करून म्हैशी,गाईचे वाटप करत त्याच्या हाताला काम मिळवून दिले आहे. अशा कायम लोकोउपयोगी कामामुळे बाबासाहेब माळी डफळापूरसह तालुक्यातील चर्चेत चेहरा बनले आहेत. कायम नाविन्याची कास धरत त्यांनी नवे उद्योग उभारणी काम सुरू केले आहे. सामान्य कुंटूबातून आलेल्या व समाज्याशी नाळ जोडलेल्या बाबासाहेब माळी यांच्या शंब्दाला डफळापूरात मोठा मान आहे.त्यांच्या मदतीने अनेक युवकांना उद्योग,व्यवसाय उभारणी करण्याची ताकत मिळाली आहे.नुसते कर्जच नव्हे तर मानसिक ताकत देण्याचे काम चेअरमन बाबासाहेब माळी यांनी केले आहे. मुळात संस्थेच्या नावाप्रमाणे निस्वार्थ व पारदर्शी काम करणारे बाबासाहेब माळी यांच्या मुळे अनेक व्यापारी, बेरोजगार तरूणांना जगण्याची उम्मेद मिळाली आहे.दत्त पंतस्थेत कर्ज लगेच मिळणारचं असा विश्वास खातेदारांचा आहे.किंबहुना चांगल्या खातेदारांसाठी संस्थेने तातडीने कर्ज पुरवठा करण्याच्या सुचना चेअरमन माळी यांच्या असतात.










