जत,प्रतिनिधी:खैराव (ता.जत)येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतशिवारातही पाणीसाठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधार्थ भटकणाऱ्या काळविट 50 फुट खेल विहिरीत पडले.त्याला बाहेर काढताना वाचविण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. सिध्देश्वर खिलारे यांच्या खोल विहिरीत पाणी शोधण्यासाठी आलेले काळविट पडले.विहिरीस संरक्षक कठडे देखील होते.मात्र तहानने व्याकूळ झाल्याने कठड्यावरून ते विहिरीत पडले.यांची माहिती नवविभाला देण्यात आली. त्यांनी प्रयत्न केला मात्र काळविट मृत्त झाले.पावसाने बगल दिल्याने तलाव,ओढापात्रे कोरडी पडली आहेत.त्यामुळे जत दक्षिण भागातील पशूधन धोक्यात आले आहे.पाणी मिळत नसल्याने मंगळवेढा किंवा सांगोला परिसरातील हे काळविट पाणी शोधत येथे पर्यत आले असण्याची शक्यता वनविभाग अधिकाऱ्यांनी वर्तवली.
मृत्यू झालेल्या काळविंटाचा पंचनामा वनविभागाने केला. यावेळी वनक्षेत्रपाल हरिबा मोहिते श्री.मुजावर सरपंच राजाराम घूटूकडे ,सुनिल जिपटे,सचिन वगरे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी ,ग्रामस्थ उपस्थित होते.
खैराव (ता.जत)येथील विहिरीत पडून मृत्यू झालेल्या काळविटांचा पंचनामा करण्यात आला.वनक्षेत्रपाल हरिबा मोहिते व ग्रामस्थ उपस्थित होते





