डफळापूर, वार्ताहर : विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली..असा हा विठ्ठल, रखुमाई आणि त्यांच्या भक्तीत दंग झालेले वारकरी शाळा-शाळांमध्ये अवतरले. ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाची आळवणी झाली आणि सोमवारी आषाढी एकादशीचा योग साध येथील विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलच्या बाल वारकऱ्यांनी दिंडीचा आनंद अनुभवला.
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भाविकांच्या लाडक्या विठूरायाची आषाढी एकादशी सोमवारी होत आहे. महिन्याभरापूर्वी सुरु झालेल्या दिंड्या आता पंढरपुरात विठ्ठल भेटीसाठी विसावल्या आहेत. एकादशीला दहा लाखावर वारकऱ्यांनी विठ्ठल दर्शनासाठी हजेरी लावली आहे.
सोमवारचा योग साधत शाळातून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले मुलं-मुली शनिवारी मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळीला बुक्का, गळ्यात टाळ, आणि मुली नऊवारी, केसात गजरा, साजश्रृंगार, डोक्यावर तुळस अशा सुंदर वेशभूषेत आले.
एक मुलगा आणि मुलगी विठूराय व रखूमाई झाले. पठडीतल्या अभ्यासाला सुट्टी मिळाली आणि हे बाल वारकरी विठ्ठल भक्तीच्या शाळेत रमले. परिसरातून दिंडी काढण्यात आली.येथील विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्याच्या बाल दिंडीचे जेष्ठ पालक हिमालय संकपाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मार्गस्थ केली. गावातून निघालेली दिंडी,दत्त पतसंस्था मार्ग बाजार पेठ,स्टॅड परिसरातून स्कूलकडे परतली.यावेळी शाळेती विद्यार्थ्यांनी केलेल्या विठ्ठल, रुकमीनी, संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर, संत बहिनाबाई,या संतासह वारकऱ्यांच्या हुबेहुब पोशाखामुळे साक्षात हे देव व संत आवतरल्याचा भास होत होता.यावेळी संस्थापक परशूराम चव्हाण,संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी, सर,धनाजी सुतार, सदिंप पोतदार,बालाजी सुतार व पालक उपस्थित होते. शाळेच्या शिक्षकांनी नेटके नियोजन केले.
दरम्यान एकादशीला येथील विठ्ठल मंदिराला रंगरंगोटी व रोषणाई करून सजविण्यात आले आहे. भाविकांच्या दर्शनासाठी मोठी मांदीयाळी होती. या दिवशी सकाळी मंदिरापासून नंदवाळसाठी पायी दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
उपवासाच्या पदार्थांना मागणी..
एकादशीनिमित्त उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. वरीचे तांदूळ, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा लाडू, केळी, चिक्की, खजूर या साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची लगबग सुरु होती.
डफळापूर : येथील विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्याची बालदिंडी






