शेगाव, वार्ताहर: बेवनुर (ता.जत )येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालेलवस्ती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती या शाळा शिक्षिका विना आहेत.लगतच्या शाळेतील एक शिक्षक कामगिरी वर पाठवून शाळा सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या शाळेतील रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी संरपच सौ.सुमन वाघमोडे यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
बेवनुर येथे सात प्राथमिक शाळा आहेत. त्यापैंकी दोन शाळेतील शिक्षक बदली झाले आहेत. त्यामुळे तेथे एकाच शिक्षकावर कशीतरी शाळा चालविली जात आहे.शाळेत मोठा पट असतानाही तेथे शिक्षक नेमले जात नाहीत.एकाच शिक्षकामुळे मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम झाला आहे.तातडीने संबधित विभागाने येथे शिक्षक द्यावेत असे निवेदनात म्हटले आहे.माजी सरपंच मारुती सरगर माजी सरपंच पोपट शिंदे, संतोष शिंदे ,बाळासाहेब वाघमोडे यावेळी उपस्थित होते.