जत,प्रतिनिधी: दरिकोणूर ता.जत येथील विवाहिता अदिफा आब्दुलबाशीद शेख(वय23)हिला पती,सासूने गंभीर मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद तिने पोलिसात दिली आहे.याप्रकरणी पती आब्दुलबाशीद वजिर शेख(वय25),सासू खुतुनबी वजिर शेख(वय45) या दोघा विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अदिफा व आब्दुलबाशीद यांचा विवाह जून महिन्यात झाला आहे. विवाह होऊन महिना होताच लग्नात मानपान केले नाही म्हणून अदिफाला पती व सासू सतत त्रास देत होते.शुक्रवारी रात्री अदिफाला दोघानी घराबाहेर काढत मारहाण केली.असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तम्मा चोरमुले करत आहेत.