जत | वर्षभरात 100 दुचाकी पळविल्या,एकाचाही छडा नाही ; तपास सुरू आहे शिवाय उत्तरे मिळेनात |

0
4

जत,प्रतिनिधी:दुचाकी पार्किंगला सुरक्षित ठिकाण कोठे, अशी म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. शहरासह तालुक्यातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. मागील सहा महिन्यांत सुमारे 100 वाहनांची चोरी झाली असून,सरासरी एक दिवसाआड एकतरी वाहन चोरीच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. तक्रारदारालाही कच्ची नोंद घेऊन मोटारसायकल मिळाल्यानंतर गुन्हा नोंदवू, अशी उलटसुलट उत्तरे पोलिस ठाण्यातून मिळत असल्याने वाहनचोरीने डोकेदुखी आणखीन वाढविली आहे.काही गाड्या हरविल्याची नोंद करूनही तपास शुन्य आहे.घरासमोर,सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या दुचाकी गाड्या चोरल्या जात आहेत. वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण झाले आहेत. आठवडा बाजाराच्या ठिकाणी तर वाहन चोरट्यांचा सुळसुळाट असतो. त्यातही मोटारसायकल चोरीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर येत आहे. या वाहनांची संख्याही सर्वाधिक असल्याने त्याचे स्पेअर पार्ट सुटे करून विकण्याच्या फंडा अनेक चोरट्यांकडून चालविला जातो. शहरातील पोलिस ठाण्यात येणार्‍या ‘दोन दिवस वाहन शोधा, तक्रार करायची काय गडबड आहे’ अशी उलट उत्तरे दिली जातात. तसेच बहुतेक गुन्ह्यात सुरुवातीला कच्ची नोंद करून, नंतर गुन्हा दाखल करण्याचे काम होताना दिसत आहे.
एकही वाहन चोरीचा छडा नाही.
जत तालुक्यातील गेल्या वर्षभरापासून चोरील् गेलेल्या घटना उघडीस आल्या आहेत.100 वर दुचाकी चोरी झाल्या आहेत. मात्र गेल्या वर्षभरात एकाही चोरीचा छडा लागला नाही. हे कुणाचे अपयश म्हणायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुचाकी मालकांना तपास सुरू आहे यापुढे उत्तरे मिळत नसल्याचे वास्तव आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here