डफळापूर,वार्ताहर : येथील ग्रामपंचायती कडून राबविलेल्या रमाई घरकुल व प्रधानमंत्री घरकुल योजने मधील घरांचे मस्टर काढण्यासाठी पंचायत समिती कडून दिंरगाई होत आहे. घरे पुर्ण झाली तरी पायाचे अनुदान मिळत नसल्याने लाभार्थांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. याकडे संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने ही रक्कम लाभार्थांना द्यावी अशी मागणी ग्रा.पं.सदस्य मुरलीधर शिंगे यांनी केली आहे.
डफळापूर ग्रामपंचायती कडून रमाई आवास योजनेतून 17 तर प्रधानमंत्री आवास योजनेतून 13 घरकूले मंजूर करून कामे सुरू आहेत.या योजनेतील पाया काढण्यासाठीचा निधी रोहयो मधून दिला जातो.एका लाभार्थांना 18000 रूपये अनुदान मिळते.त्यासाठी मस्टर काढावे लागते.ते पंचायत समितीकडे दाखल करून तेथून त्याची रक्कम दिली जाते.ग्रामपंचायतीच्या 30 घरकूलाचे मस्टर रोजगार सेवकाच्या विलंबानंतर ग्रामपंचायती कडून पंचायत समितीला सादर केले आहे. लाभार्थांची कागदपत्रेही संबधित विभागाकडे दिली आहेत.घरकूले लाभार्थांनी घराचे पुर्ण बांधकामे करून ग्रामपंचायती कडे असणारा निधी घेतला तरीही पायातील कामाचे बिल मिळाली नाहीत.त्यामुळे लाभार्थांच्यात नाराजी आहे.अनेकांनी कर्जे काढून घरे बांधली आहेत. त्यांचे यामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने मस्टर काढावे अन्यथा लाभार्थांसह पंचायत समिती समोर अंदोलन करू असा इशारा शेवटी शिंगे यांनी दिला.





