येळवी, वार्ताहर :येळवीसह तालुक्यात दुसऱ्यादिवशी दूध आंदोलनाचा भडका उडाला असून ग्रामीण भागात रस्त्यावर दूध फेकून ठिकठिकाणी दुधाचा चिखल झाला होता.येळवीत मुख्यंमञी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस दुधाच अभिषेक घालून शासन धोरणाचा निषेध करण्यात आला.
येळवीत मुख्यमंत्री यांना दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्याचे मागण्या मान्य करून दुधाला दर दयावा जो पर्यंत दुधाला दरवाढ मिळत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांचे अंदोलन कायम राहणार आहे. या आंदोलनात शेतकरी लिंबाजी सोलनकर,दीपक अंकलगी,संतोष स्वामी,नवनाथ पवार,राजू कदम,दीपक चव्हाण,अशोक सुतार,अशोक वांगी,पिंटू जीपटे, गंगाने साहेब व येळवीत शेतकरी व दुध व्यवसाइक यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
दूध आंदोलनावर तोडगा न निघाल्यास दुधाचे दर गगनाला भिडतील, अशी भीती शहरवासीय करत आहेत. दुधाला योग्य भाव मिळेपर्यंत जिल्हाभरातील शेतकरी दूध विक्री करणार नसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे.दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून दूध आंदोलन सुरू केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवून रस्त्यावर दूध ओतले जात आहे. दुधाला प्रति लिटर 5 रु. अनुदान द्यावे आणि 35 रु. प्रति लिटर भाव देण्यात यावा, ही प्रमुख मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकर्यांनी केली आहे.राज्यात गायीच्या दुधाचे एक कोटी पाच लाख लिटरच्या आसपास संकलन होते. दूध संघाला प्रति लिटर तीन रुपये अनुदान देण्यात आले आहे. मात्र दूध संघाने ते अन्यत्र वळवले आहे. याप्रकरणी प्रत्यक्ष दूध उत्पादक किंवा राज्य सरकार शेतकर्यांच्या खात्यात प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान थेट जमा करावे, अशी मागणी खा. राजू शेट्टी यांनी केली आहे
शेतकर्यांच्या बँक खात्यात हे अनुदान थेट जमा करावे, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. यापूर्वी पुणे शहरात दूध आंदोलन केले होते, परंतु सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे 16 जुलैपासून कोणताही शेतकरी दूध विकणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे.दरम्यान जत तालुक्यातील अनेक गावात तिसऱ्यादिवशीही दुध बंद अंदोलनास पांठिबा देण्यासाठी दुध संकलन बंद ठेवण्यात आले आहे.त्याशिवाय अनेक ठिकाणी रस्तावर दुध ओतून निषेध करण्यात आला.
येळवी ता.जत येथे मुख्यंमञी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस दुधाने अभिषेक घालून शासन धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.
Attachments area





