खेळ,,,, बैठे खेळ, मैदानी खेळ, ह्या मध्ये खेळले जाणारे अनेक खेळ आपणाला माहित आहेत, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बुद्धिबळ, असे हे खेळ खेळणारे क्रीडापटूंची नावे सुद्धा माहित असतात, पण ” गोटया ” मधील कथा हि अशा एका खेळाबद्दल आहे तो केवळ आपल्या देशातच नाही तर इतर अनेक ठिकाणी तो खेळला जातो, त्या खेळाचं नाव आहे ” गोट्यांचा खेळ “, या खेळाची आवड बालपणापासूनच मुलांना असते, आपल्या बालपणी हा खेळ बहुदा प्रत्येकानं खेळलेला असतो, पण ह्या खेळाला कोणत्याही स्पर्धेत मान्यता नाही, तरी पण हा खेळ मोठया पातळीवर खेळाला जावा अशी भावना आहे. अश्या ह्या अनोख्या विषयावर निर्माते जय केतनभाई सोमैया आणि केतनभाई सोमैया प्रस्तुत विहान प्रॉडक्शन आणि द्वारा मोशन पिक्चर या चित्रपट संस्थेतर्फे ” गोटया ” ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माते नैनेश दावडा, निशांत राजांनी हे आहेत. कथा–पटकथा–संवाद–दिगदर्शन भगवान वसंतराव पाचोरे यांनी केलं आहे. छायाचित्रणाची जबाबदारी बाशालाल सय्यद यांनी सांभाळलेली असून संकलन राहुल भातणकर यांनी केलं आहे. गीते भगवान पाचोरे आणि संगीत अवधूत गुप्ते यांचे आहे. यामध्ये ऋषिकेश वानखेडे, राजेश शृगांरपुरे, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शशांक दरणे, शरद सांखला, असे अनेक कलाकार आहेत.
हि कथा आहे ” गोटया ” नावाच्या मुलाची, इरसालवाडी गावात बायजा आणि बाजीबा ह्या दांपत्याला नवसाने झालेला मुलगा असतो, आपल्या आई–वडिलांच्या बरोबर तो गावात राहत असतो. शाळेत जाऊन अभ्यास करणे ह्या बरोबर तो ” गोट्यांचा खेळ ” खेळत असतो, त्याला लहानपणापासूनच ह्या खेळाची आवड निर्माण झालेली असते, जळीस्थळी त्याला “रंगीबेरंगी गोटया ” दिसत असतात, ह्या खेळामुळे त्याला आई–वडिलांचा मार सुद्धा खावा लागतो, शिक्षक त्याला शिक्षा करतात, कुस्ती, खो–खो कबड्डी असे खेळ शिकवले जातात त्याप्रमाणे ” गोट्यांचा खेळ ” शाळेत शिकवावा अशी त्याची आणि त्याच्या मित्रांची इच्छा असते. त्याचे एक स्वप्न असते कि ह्या खेळाचा आंतरराष्ट्रीय खेळा मध्ये समावेश व्हावा, हि इच्छा तो शाळेत बोलून दाखवतो, पण ते शक्य नसते, शेवटी शाळेमधील शिक्षक , पालक, गावातील सरपंच, आणि प्रतिष्ठित मंडळी एक बैठक घेतात. कालांतराने ” गोट्यांचा खेळ “शिकविण्यासाठी प्रशिक्षकांची नेमणूक केली जाते, खेळाचे सर्व नियम गोट्याला शिकवले जातात. ” गोट्यांच्या खेळाच्या ” स्पर्धा तालुका, जिल्हास्तरावर, होतात आणि त्यामध्ये त्यांच्या शाळेला बक्षिसे मिळतात,
शेवटी हा खेळ ” आंतरराष्टीय स्तरावर ” खेळला जातो कि नाही ह्याचे उत्तर सिनेमात मिळेल. यामध्ये ऋषिकेश वानखेडे, यांनी गोट्याची मध्यवर्ती भूमिका मनलावून केली आहे.राजेश श्रुंगारपुरे यांनी प्रशिक्षकाची भूमिका केली असून सोबत आनंद इंगळे, सयाजी शिंदे, सुरेखा कुडची, हेमांगी राव, कमलाकर सातपुते असे अनेक कलाकार आहेत. भगवान पाचोरे यांनी चित्रपटाचे दिगदर्शन केलं असून चित्रपट बंदिस्तपणे सादर केला आहे. काही ठिकाणी चित्रपट रेंगाळतो तरी सुद्धा पकड घेण्याचा प्रयत्न करतो, गीते – संगीत ठीक आहे. ह्या खेळाविषयीची माहिती चित्रपटातून मिळते. हा ” गोट्यांचा खेळ ” बघायचा कि नाही हे प्रेक्षकच ठरवतील….
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७





