जत,प्रतिनिधी: बिळूर ते जत रस्त्यावर सिमेंट वाहून नेहणार डम्पर प्रवाशी वाहतुक करणाऱ्या जीपला सोमरून धडक दिल्याने अक्कव्वा कामगोंडा पाटील(वय 45, रा. तावशी,ता.अथणी) या महिला ठार झाल्या. अपघातात अन्य आठजण जखमी झाले. रविवारी आकराच्या सुमारास घडला.
प्रवाशी वाहतुक करणारी जिप केए -33 -एम-7957 ही अथणीहून जतकडे येत होती. तर सिमेंट टँकर क्रमांक -एमएच -12-एनएक्स- 1130 अथणीकडे जात होता. बिळूर गावानजिक वळणावर टँकरने जीपला जोराची धडक दिली. धडक इतकी भिषण होती की धडकेने प्रवाशी भरलेली जीप रस्त्याकडेला पलटी झाली.यात जोराचा धका बसल्याने जिपमधील अक्कव्वा यांच्या डोक्यास दुखापत झाल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी जतकडे आणत असताना त्यांचे वाटेत निधन झाले. कर्नाटकातील तावशी येथील अक्कव्वा या गुड्डापूर येथे देवदर्शनासाठी निघाल्या होत्या.त्याचा वाटेत दुर्देवी मुत्यू झाला.जिपमधील अपघातात आठजण जखमी झाले. जखमींची नावे अशी
नकुसा रावसाहेब अरळे, योगेश रावसो अरळे, सिद्राया कृष्णा भंडारे,(दोघे रा एेनापूर),मुदकाप्पा रूद्राप्पा पाटील,(रा.मसरगुप्पी),भिमाण्णा तम्मण्णा जाबगोंड(रा.सिंदूर),कामाबाई दादू सोलनकर,(रा. तावशी),हाैसाबाई विठोबा लोखंडे,
सादाशिव गुरबसू सोलनकर,(रा.खिलारवाडी)याबाबत जत पोलीसांत नोंद झाली आहे.दरम्यान जत-अथणी रोडवरील बिंळूर नजिकचे वळणचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धोकादायक वळण काढण्याची मागणी असूनही संबधित विभागाची डोळेझाक नाहक जीव घेत आहेत.
बिंळूरजवळ डम्परने धडक दिल्याने जिप पलटी होऊन अपघात झाला.







