संख,वार्ताहर: संख ता.जत येथील एका तरूणीवर बलात्कार करून खून केल्या प्रकरणी पकडलेल्या सशयिंत आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 23 जुलैपर्यत पोलिस कोठडीत सुनावली.
संख पासून तीन किलोमीटर वर राहणाऱ्या तरूणीच्या घरात कोण नसल्साचा फायदा घेत संशियत आरोपी श्रीशैल शिवगोंडा दाशाळ यांने बलात्कार करून खून केल्याचा कबूली जबाब पोलिसांना दिला आहे.
प्रेमप्रकणातून झालेल्या या घटनेनंतर तब्बल चार दिवसापासून फरारी असलेल्या दाशाळ याला पोलिसानी पुणे येथून शनिवारी ताब्यात घेतले. त्याला रविवारी न्यायालयात उभे केले. न्यायालयाने 23 जुलै पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसाच्या प्राथमिक अंदाजानुसार सशिंयत श्रीशैल दाशाळ या एकट्यानेच ही घटना केल्याची शक्यता वर्तवली आहे.तरीही अन्य शक्यता पडताळून पोलिस पाहत आहेत. त्याशिवाय दाशाळ याला कोणीकोणी मदत केली आहे. यांचाही तपास पोलिस करत आहेत. दरम्यान अन्य सशयिंत आरोपीना चौकशी करून सोडून देण्यात आले आहेत.घटनेच्या अन्य बाबीचा तपास सुरू आहे. सशयिंत आरोपीला अन्य कोणी मदत केली आहे का ? यांचाही तपास सुरू असल्याचे तपासअधिकाऱ्यांनी सांगितले.





