माडग्याळ | गावभागातील रस्ते राडेराड |

0
7

माडग्याळ, वार्ताहर: माडग्याळ ता.जत येथील गावातील रस्ते चिखलमय बनले आहेत. गेल्या दोन दिवसापासून रिमझिम पावसाने पाणी साठून खड्डेयुक्त रस्त्यात डबकी बनली आहेत.त्याशिवाय पाणी निचरा होत नसल्याने रस्ते राडेराड झाले आहेत. यात दुचाकी घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत. मोठी आश्वासने देऊन सतेत आलेल्या पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याच चिखलमय रस्त्यातून नागरिकांना मार्गक्रमन करावे लागत आहे. मुख्य रस्ता ते बिरोबा मंदिर सह अन्य काही रस्त्याची बिकट आवस्था झाली आहे. तातडीने यावर मुरूम टाकावा अशी मागणी होत आहे.

माडग्याळ येथील मुख्य रस्ता ते बिरोबा मंदिर रस्त्याची झालेली आवस्था

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here