संख | बलात्कार,खून प्रकरण गुढ कायम तपासासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा संखमध्ये तळ |

0
8

विविध भागात पथके रवाना 

संख,वार्ताहर: संख ता.जत येथील बलात्कार,खून प्रकरणाचे गुढ कायम आहे. तपास गतीने सुरू आहे. मात्र अद्यापपर्यत कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या अद्यापपर्यत हाती लागले नाहीत.वरिष्ठ अधिकारी व तपास यंत्रणा संखमध्ये तळ ठोकून आहेत. मंगळवार सायकांळी पासून अप्पर जिल्हा पोलिस प्रमुख शंशिकात बोराटे, डिवायएसपी निंबाळकर, तपासअधिकारी पोलिस निरिक्षक भगवान शिंदे, प्रविण संपागे संखमध्ये तपास यंत्रणा राबवित आहेत.ते सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.पुन्हा घटनास्थळ,संशियत व पिडित तरूणीचे वडील, भाऊ व नातेवाईकांच्या जबाबतून तपासाची सुत्रे हलविली जात आहेत.कर्नाटकतील काही भागात व सांगली, कोल्हापूर,कराड,सोलापुर आदी भागात पोलिसाची पथके अरोपीचा शोध घेत आहेत.संख पासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वस्तीवर पिडित तरूणीवर बलात्कार करून निर्घण पणे तिची हत्या केली आहे. अगदी नियोजन बंध्द व पाळत ठेवून आरोपींनी हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट आहे.
तसाच तपास पोलिसाकडून सुरू आहे. स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाने काही ठिकाणी शोध सुरू केला आहे. याप्रकरणी पकडलेल्या तीन सशयिंताकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.
पिडित मुलीची छेडछाड काढणारे,तिच्याबरोबर किरकोळ कारणावरून वादावादी केलेल्यांची पोलिसाकडून चौकशी सुरू आहे. घटनाक्रम,संशियत आरोपीं यांच्या व अन्य शक्यता गृहीत धरून आमचा तपास सुरू आहे.लवकरचं आरोपीच्या मुसक्या आवळू असे यावेळी तपास अधिकरी पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान पिडित मुलीचे शवविच्छेदन करून मृत्तदेहावर संख येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संख: बलात्कार, खून प्रकरणातील घटनास्थंळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपास सुरू आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here