जत | विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी:तुषार ठोंबरे. |

0
7

जत,प्रतिनिधी: विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यास उज्ज्वल यश मिळते.अधिकाऱ्यांची संख्या वाढवून या तालुक्याचे नाव उंचवा असे प्रतिपादन प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले मुचंडी (ता.जत)येथे केले.मुंचडी ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या हनुमंत मिरजी यांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला,त्यावेळी ते बोलत होते.प्रांताधिकारी ठोंबरे पुढे म्हणाले की,श्रीमंतांना संघर्ष करावा लागत नाही मात्र गरिबांना मोठा संघर्ष करावा लागतो. यासाठी मुचंडी गावातील सर्व शिक्षकांनी विशेष लक्ष देऊन शाळेतील चांगले विद्यार्थी घडवावेत. प्रथमपासून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी असे त्यांनी आवाहन केले.पोलीस निरीक्षक राजीव तहसीलदार म्हणाले, विद्यार्थ्यांना लहान वयात योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ते वाहत जातात यासाठी बालवयात पालकांनी मुलांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.अधिकाऱ्यांच्या पिठ्या घडतील असे विद्यार्थी घडावेत यासाठी लोकप्रतिनिधी व पालकांनी प्रयत्न करावेत.असे शेवटी तासीलदार म्हणाले,
हनुमंत मिरजी हा पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मुचंडी ग्रामपंचायत यांच्या वतीने गावातून वाजत गाजत त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सत्कार सभारंभ संपन्न झाला.यावेळी आप्पासाहेब बिरादार,संजय काटे, संभाजी जाधव,संजय बिरादार.आय.सी.पाटील आदी उपस्थित होते.

हनुमंत मिरजी हा पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मुचंडी ग्रामपंचायत यांच्या वतीने गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here