बिळूर | येथे दारु दुकानात चोरी |

0
8

जत,प्रतिनिधी:जत तालुक्यातील बिळूर येथे लायसन्सधारक (शासनमान्य)देशी दारुच्या दुकानास मागील बाजूच्या भिंतीस भगदाड पाडून 38 बाॅक्स  चोरट्यानीं लंपास केले.याच दुकानात ही दुसरी चोरीची घटना आहे. मंगळवारी सुमारे 95 हाजाराचा मुद्देमाल पळविला आहे.याबाबतची फिर्याद मालक किरण रमेश कलाल यांनी जत पोलिसात दिली आहे.
सिंदूर रोडवर कलाल यांचे देशीदारूचे दुकान आहे.सोमवारी मध्यरात्री दुकानाची भिंतीला भदगाड पाडून आतिल बॉक्स काढून लंपास करण्यात आले आहेत.गेल्याच महिन्यात याचं दुकानात चोरी झाली होती.त्यावेळी एक लाख सहासष्ठ हाजार रूपये   किंमतीची दारु बाॅक्स चोरीस गेले होते.त्यांचा छडा अद्याप लागला नाही.तोवर दुसरी चोरीची घटना घडली आहे. यांचातरी तपास लागणार का?असा सवाल उपस्थित होत आहे.मंगळवारीच्या घटनेची नोंद झाली आहे.
बिंळूर येथे सरकारमान्य दारूचे दुकानाला भदगाड पाडून आतिल 38 बॉक्स लंपास केले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here