मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सर्वाधिंक रस्ते जतेत
जत,प्रतिनिधी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जत तालुक्यातील विविध रस्त्यासाठी 22 कोटी 23 लाख 86 हजार निधी मंजूर झाले आहेत. अनेक वर्षांपासून रस्त्याचा बॅकलॉग गेल्या साडेतीन वर्षात पूर्ण करू शकलो याचे समाधान आहे. तालुक्यातुन तीन राष्ट्रीय महामार्ग जाणार असल्याने शेतीपूरक व्यवसायाची चलती होणार आहे. यामुळे शेतकऱ्याचे अर्थकारण वधरणार असल्याने त्यांचे जीवनमान उंचवणार आहे.असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून खोजनवाडी ते बुरलट्टी (कोटलगी), उंटवाडी ते मेंढेगिरी, पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर, पाच्छापूर फाटा ते रावळगुंडवाडी, पांढरेवाडी ते लमाणतांडा, उटगी ते गिरीषफार्म,उटगी ते चनगोंडवस्ती, उटगी ते मर्चंडतांडा, अबाचीवाडी ते लकडेवाडी या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याच्या कामाचे आज उद्घाटन आ.जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. असून काम लवकरच पूर्ण होईल. याशिवाय 2 कोटी 6 लाख रुपये खर्चून बाज ते माधवनगर रस्त्याचे काम होणार आहे. अत्यंत खराब झालेला व्हसपेठ उमदी ते चडचण सिमेपर्यत पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पूर्व भागातील सर्व रस्ते चकाचक होतील.
आ.जगताप म्हणाले,विरोधकांची विकास न झाल्याची ओरड असते. त्याचे टीका करण्याचे कामच आहे. त्याकडे लक्ष न देता विकास हा एकच अजेंडा ठेवला आहे. त्यामुळे साडेतीन वर्षात तालुक्याच्या अनेक समस्या सोडवू शकलो. म्हैसाळ योजनेचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करून बंद पडलेली योजना कार्यान्वित केली. मुख्य कालव्यासह अंकले, खलाटी पंपहाऊसचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे लवकरच म्हैसाळ योजनचे पाणी तालुक्याला मिळणार आहे. पूर्व गावातील 42 गावांसाठी कर्नाटकातून पाणी आणण्यासाठी दोन्ही राज्याच्या जलसंपदा मंत्र्याची बैठक होणार आहे. आणखी दीड वर्षाच्या कालावधी असून यात सर्वांगीण विकास करण्याचा प्रयन्त करू असे शेवटी जगताप म्हणाले. शिक्षणसभापती तमनगौडा पाटील, माजी सभापती प्रकाश जमदाडे, जि प सदस्य सरदार पाटील,अॅड.प्रभाकर जाधव माजी प स सदस्य सुनील पवार तसेच गावचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.
जत तालुक्यातील मुख्यंमञी ग्रामसडक योजनेतून होत असलेल्या विविध रस्ता कामाचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.





