जत,प्रतिनिधी : पानी फाऊंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा,2018 च्या माध्यमातून देवनाळ, ता. जत हे गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी तुफान आल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. अख्खा गाव श्रमदानात उतरला होता. जात-पात, धर्म- पंथ, स्री- पुरुष, गरीब – श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकजण हातात टिकाव, पाटी आणि खोरे घेऊन राबत होता. पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत देवनाळ गावाने तण, मन, धनाने दिवसरात्र एकत्र येत आपले गाव पाणीदार करण्यासाठी उत्साहने मोठया प्रमाणात जलसंधारणाची व पाणलोटाची कामे केली. या कामाची पाहणी व मुल्यमापन करण्यासाठी पानी फाउंडेशनच्या तपासणी टीमने देवनाळ गावाला नुकतीच भेट दिली.
जत तालुक्यातील एकुण 12 गावांपैकी 106 गावांनी या स्पर्धेत भाग घेतला होता,त्यापैकी देवनाळ, बागलवाडी, मोकाशेवाडी, आंवढी व कुलाळवाडी अशा एकुण पाच गावात उत्तम काम झालेले आहे.गुरूवारी तपासणी टीमने देवनाळ गावाचा दौरा केला व 45 दिवसाच्या केलेल्या कामाचा आढावा घेऊन, ग्रामस्थांशी चर्चा करुन आलेले अनुभव व मनोगते जानुण घेतली. पाण्याचा ताळेबंद, माती परीक्षण व शोषखड्डे पाहुन त्याबद्दलचे काही प्रश्न ग्रामस्थांना विचारले. गावामधे काम करत असताना आलेल्या अडचणी, त्यावर मात करुन केलेली कामे यावरही भर दिला. तसेच विविध पाणलोट उपचार यावर प्रश्न विचारल्यानंतर टीमने शिवार फेरी केली व पाणलोटाचे विज्ञान
योग्य आहे की अयोग्य, त्याची गुणवत्ता याची तपासणी केली. त्याचबरोबर शोषखड्डे, रोपवाटीका, सी.सी.टी, डीप सी.सी.टी, कंपार्टमेंट बंडीग, कंटुर बंडीग, शेततळी, माती नाला बांध व ओढा खोलीकरण रुंदीकरण अशा विविध उपचार पद्धतीची पाहणी करुण निरीक्षणे नोदंविली व केलेल्या कामाचे स्वरुप पाहुन समाधान व्यक्त केले.45 दिवसाच्या संपुर्ण कामाचे स्वरुप व सादरीकरण प्रा. तुकाराम उर्फ सागर सन्नके यांनी केले.देवनाळ गावाने श्रमदानाने व मनुष्यबळाने 7790 तर यंत्राने 156362१ असे एकुण 164152 घनमीटर इतके काम केले आहे. हे काम करत असताना श्रमदानाचे महागुरु व दाताचे डॉक्टर ते पाण्याचे डॉक्टर असा प्रेरणादाई इतिहास असणारे डॉ. अविनाश पोळ व जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख यांचे विषेश मार्गदर्शन गावाला लाभले. या मुल्यमापन टीमसोबत जत तालुका समन्वयक हीना मुजावर, गोविंद विभुते, तुकाराम पाटील तसेच गावच्या सरपंच सौ. महानंदा दुधाळ, उपसरपंच श्री. दर्याप्पा उर्फ राजु कुंभार, पोलीस पाटील सौ. सविता शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जलनायक, जलनायीका, नेतेमंडळी, विद्यार्थी, महिला, कामगार, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जत तालुक्यातील पानी फांऊडेशन स्पर्धेतील विजयाचे दावेदार असलेल्या देवनाळ गावात झालेल्या कामाची तपासणी निरिक्षक टीमने केली.






