जत,प्रतिनिधी :
शासनाच्या महत्वकांक्षी योजनेची उद्दिष्ठ पुर्ती करून जत तालुक्यात वृक्षसंवर्धन वाढवा,वृक्ष जगले तर दुष्काळ मुक्ती निश्चित आहे. त्यामुळे वृक्ष लागवडी बरोबर वृक्ष संगोपन महत्वाचे आहे.असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी केले.
शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत जत तालुक्यातील रेवनाळ, तिपेहळ्ळी, व्हसपेठ व गिरगाव येथे आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रमाचे नियोजन केले होते.आमदार विलासराव जगताप म्हणाले की जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे त्यामुळे या तालुक्यात आहे फॉरेस्ट विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने विशेष लक्ष देऊन तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करून महाराष्ट्र शासनाचा 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे यासाठी आम्ही सर्वोतपरी मदत करू अशी ग्वाही दिली.यावेळी रेंज फॉरेस्ट ऑफिसर महादेव मोहिते म्हणाले, शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीचा उद्दिष्ट असून जत तालुक्याच्या वाट्यास आलेले वृक्ष लागवडीचे सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्याची तयारी पुर्ण झाली आहे. रेंज फॉरेस्ट ऑफिसर महादेव मोहिते परिमंडळ अधिकारी शंकर गुगवाड,शकील मुजावर,श्री. पाटील सामाजिक वनीकरणचे श्री.शेख,विठ्ठल कोळी,अजित देवकते,नरेंद्र कोळी केरू शेजुळ,मुकेश बनसोडे,साहेबराव शेजुळ,बबन कोळी,नागू बनसोडे संबधित गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.





