डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत पेयजल योजनेचे काम अंतिम टप्यात आले आहे.विज जोडणी,मोटारी,जँकवेल दुरूस्तीचे काम अखेरच्या टप्यात आहे.पुढील काही दिवसात पाणी सोडण्याची चाचणी होणार असल्याची माहिती जि.प सदस्य महादेव पाटील यांनी दिली.
सोमवारी जत पंचायत समितीचे शाखा अभिंयता श्री.कोराळे,जि.प सदस्य पाटील यांनी पाणी योजनेच्या कामाची पाहणी केली.प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.अनेक दिवसापासून रखडलेल्या पाणी योजना चालू व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी बरोबर जनरेटा वाढला आहे. डफळापूरला भासणारी पाणी टंचाई लक्षात घेता योजना पुर्ण करणे आनिवार्य आहे. त्यामुळे कामात गती आली आहे.पाईपलाईन जोडणी,जँकवेल दुरूस्ती, विज जोडण्या अंतिम टप्यात आल्या आहेत. टाकीचीही उर्वरित कामे लवकरच होणार आहेत.त्यामुळे पुढील काही दिवसात पाणी सोडण्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यापुढील कामे पुर्ण करून डफळापूरची पाणी टंचाई पुर्णत: संपविण्यासाठी माझा प्रयत्न कायम असेल असेही पाटील यांनी शेवटी सांगितले.
डफळापूर पेयजल पाणी योजनेच्या कामाची पाहणी करताना शाखा अभिंयता कोराळे व जि.प.सदस्य महादेव पाटील आदी





